अभिवादनासाठी राज्यातील शेकडो नागरिक पानिपतला रवाना मुंबई -हरियाणामधील रोड मराठा समाजाचे मूळ महाराष्ट्रामध्ये आहे. त्यांच्या घरात खाण्यात पिण्यात, भाजी भाकरी, कांदा भाकरी बेसन, पिठलं हे पदार्थ आज ही दिसतात. या त्यांच्या रोजच्या जगण्यामधून मराठी संस्कृती आजही टिकून आहे. त्यांचे सणसणावार हे देखील मराठीच आहेत. हरियाणामधील मराठी लोकांना रोड मराठा का? म्हणतात जाणून घेऊया सविस्तरपणे
रोड मराठा समाज म्हणजे काय -पानिपतच्या लढाईमध्ये मराठ्यांचा पराभव झाला होता याबाबतचा इतिहास आपल्याला माहित आहे. पानिपतची तिसरी लढाई 14 जानेवारी 1761 या दिवशी लढली गेली. भारतातील हरियाणा या ठिकाणी पानिपत या गावाजवळ ती लढाई झाली होती. पहिली दोन युद्धे याच ठिकाणी झाली होती. त्यामध्ये मुघल सत्तेची सरशी झाली होती. भारतातील महत्त्वाची गाजलेली तिसरी लढाई मुघलांचा सेनानी अहमदशाह अब्दाली तसेच महाराष्ट्रातील मराठ्यांमध्ये झाली होती. या लढाईत अहमदशाह अब्दालीने मराठी साम्राज्याचा मोठा पराभव केला होता.
अनेक मराठी योद्ध्ये धारातीर्थ -याच पराभवामध्ये 18 पगड जाती कशा वेगवेगळ्या आहेत. त्याचा फायदा अहमदशाह अब्दालीने घेतला याबाबत देखील इतिहासामधून आपण वाचत असतो. या लढाईत अनेकांना प्राण मुकावे लागले होते. या लढाईत जे मराठे योद्धे वाचले त्यांनी तेथेच राहण्याचा निर्णय घेतला. त्यांचे वंशज आजही या भागात आढळून येतात. हरियाणात त्यांना रोड मराठा या नावाने ओळखल्या जाते.
40 ते 50 हजार मराठा सैनिकांनी गमावला जीव - 14 जानेवारी 1761 रोजी झालेल्या लढाईत महाराष्ट्रातील मराठा सैन्याचा पराभव झाला होता. त्या लढाईत अहमदशाह अब्दालीने मराठ्यांचा पराभव केला. 40 ते 50 हजार मराठा सैनिकांना या लढाईत मारले गेले होते असे, इतिहास संशोधकाचे मत आहे.
मराठी संस्कृतीचे दर्शन -हरियाणातील पानिपत येथे नफेसिंग यांचा हातभट्टीचा व्यवसाय आहे. त्यांना मराठी येत नाही, त्यांनी महाराष्ट्राला भेट दिली नाही, परंतु त्यांच्या काही संस्कृतीतून मराठी संस्कृतीचे दर्शन घडते. या संदर्भात डॉ.वसंतराव मोरे यांच्या रोड मराठा का इतिहासातही या प्रकरणाचा सविस्तर इतिहास आहे.
मराठ्यांचे पुर्वज आजही हरियाणात - मराठी योद्ध्यांनी दिलेल्या बलिदानाला अभिवादन करण्यासाठी राज्यातील शेकडो तरुण पानीपतला जात असतात. पानिपतच्या लढाई संदर्भात ईटीव्ही भारतवतीने सुधाकर पतंगराव यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की, आज ४०० वर्षे झाली, पण लढायला गेलेले आमचे काही पूर्वज आजही आहेत. या सर्वांना रोड मराठा म्हणून ओळखले जाते. 14 जानेवारी 1761 रोजी झालेल्या युद्धात मराठा सैन्याचा पराभव झाला होता. या लढाईत अहमदशहा अब्दालीने सुमारे 40 ते 50 हजार मराठा सैनिकांना ठार मारले होते.
तर, भारत शिंदे म्हणाले,"तिकडे जेव्हा लढाईसाठी आपले पूर्वज गेले. त्यांनी अहमदशाह अब्दाली सोबत लढाई केली. त्यात अनेक जण मारले गेले. जे काही राहिले त्यातील अनेक लोक नंतर रोड मराठा म्हणून जगू लागले. राज्यातून मराठी योद्ध्यांना अभिवादन करण्यासाठी अनेक तरुण पानिपतला जातात" असे, ते म्हणाले.