मुंबई- देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई ही केंद्राला सर्वात अधिक महसूल देत आली आहे. दररोज तब्बल 70 लाख प्रवाशांची ने आन मुंबईची लोकल करते. मात्र, लोकल रेल्वेचे पश्चिम, मध्य, हार्बर, ट्रान्स हार्बर मार्ग हे मृत्यूचे सापळे झाले आहेत.
हेही वाचा-देशात प्रथमच येणार कलाकार रोबो, मुंबई आयआयटीमध्ये सादर करणार कला
दर दिवशी लोकल रेल्वेच्या प्रवासादरम्यान लाखो लोक प्रवास करत असतात. यावेळेस लोकल रेल्वेच्या अनियमित वेळापत्रकामुळे बऱ्याच वेळा लोकल स्थानकांवर गर्दी होत असते. या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य ती कार्यप्रणाली सध्या रेल्वेच्या प्रशासनाकडे नाही, असे आरटीआय कार्यकर्ते समीर जवेरी यांनी म्हटलेले आहे. बऱ्याच वेळा लांब पल्ल्यांच्या गाड्यांचे इंजिन फेल होण, रेल्वे रुळावरुन रेल्वे खाली उतरणे, याबरोबरच रेल्वेचे सिग्नल्स फेल गेल्यामुळे बऱ्याच वेळा रेल्वे वाहतुकीचा खोळंबा होतो. याचा परिणाम रेल्वे स्थानकावर गर्दी वाढून रेल्वे वाहतुकी दरम्यान अशा प्रकारच्या दुर्घटना घडत आहेत.