मुंबई :पहिल्या दिवशी इंग्रजीच्या पेपरमध्ये काही प्रश्नांसोबत उपप्रश्न कवितेच्या अनुषंगाने विचारले होते. उपप्रश्नांसोबत उत्तरे काही ठिकाणी छापली गेली होती. त्यामुळे राज्यातील तमाम शिक्षक मंडळींनी महाराष्ट्र राज्य माध्यमिक, उच्च माध्यमिक परीक्षा मंडळावर टीकेची झोड उठवली आहे. त्यानंतर परीक्षा मंडळाने रात्री उशिरा खुलासा देखील केला की ही प्रिंटिंग चूक होती.
HSC Exam : बारावीच्या परीक्षेत इंग्रजी पेपरनंतर हिंदी पेपरमध्ये निघाल्या चुका, शिक्षकांसह विद्यार्थी गोंधळात - Mistakes In HSC Hindi Paper Exam
पहिल्या दिवशी इंग्रजीच्या पेपरमध्ये चुका आढळल्या आणि ती प्रिंटिंग मिस्टेक असल्याचे महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळाने जाहीर केले. आता दुसऱ्याच दिवशी म्हणजे काल 22 फेब्रुवारी रोजी हिंदीच्या पेपरमध्ये देखील चुका आढळल्या आहेत. त्याच्यामुळे परीक्षा मंडळाच्या परीक्षा या काही अडचणींशिवाय होणार नाही, असे दिसून आले आहे.
14 लाखांहून अधिक परिक्षार्थी :मात्र त्या प्रिंटिंग चुकीमुळे राज्यातील 14 लाखापेक्षा अधिक विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. त्यांचे गुण कमी होण्याची शक्यता आहे. अशी भीती असतानाच काल हिंदीच्या पेपरमध्ये देखील काही प्रमाणात चुका आढळल्या. आता ती बाब देखील प्रिंटिंग मिस्टिक आहे हे समोर आलेले आहे. हिंदीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न क्रमांक दोनमध्ये चार प्रश्नांचे विरुद्धार्थी शब्द लिहायचे होते. मात्र त्या प्रत्येक प्रश्नाला एक-दोन, एक-दोन अशा चुकीच्या क्रमांक तिथे टाईप केले होते. एक नंतर अनुक्रमे दोन आणि नंतर तीन आणि नंतर चार असे क्रम तिथे प्रिंट केलेले असायला हवे होते. मात्र, तसे नव्हते. त्यामुळे विद्यार्थी स्वतः देखील आपल्या मनाने काय ठरू शकत नाही. शिक्षकांची इच्छा जरी असली तरी तेही देखील परीक्षा मंडळाच्या नियमापुढे जाऊ शकत नाही अशी अडचण झाली होती.
विद्यार्थी गोंधळले: काल महत्त्वाची घटना घडली की जेव्हा विद्यार्थी परीक्षा लिहायला लागले तेव्हा त्यांना हिंदीच्या पेपरमध्ये आपल्या प्रश्न क्रमांक दोनमध्ये वेगळेच आकडे दिसले. प्रश्न क्रमांक दोनमध्ये ज्या पद्धतीने अनुक्रमे आकडे पाहिजे तसे आकडे दिसले नाही. त्यामुळे विद्यार्थी बुचकाळ्यात पडले. शिक्षकांना अखेर विचारणे भाग पडले. पण हा गुंता काही सुटला नाही. त्यामुळे उत्तर नेमके काय लिहावे हे बारावीच्या विद्यार्थ्यांना समजेना. परिणामी काही विद्यार्थ्यांनी प्रश्नांची उत्तरे लिहिण्याचे सोडले तर काहींनी कसेबसे सोडवण्याचा प्रयत्न केला.
प्रिंटिंग चूक : यासंदर्भात मुंबई विभागीय माध्यमिक उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाचे अध्यक्ष नितीन उपासने यांच्यासोबत ईटीवी भारतच्यावतीने संवाद साधला. त्यावेळी त्यांनी सांगितले की, काल या संदर्भात जे काही घडल्याचे आपण म्हणाले, ती बारीकशी प्रिंटिंग चूक होती. मात्र ती परीक्षा मंडळाने दुरुस्त केली आहे. विद्यार्थ्यांचे कोणत्याही रीतीने नुकसान होणार नाही याची काळजी परीक्षा मंडळ घेणार आहे. त्यामुळे पालक आणि शिक्षकांनी याबाबत ही नोंद लक्षात घ्यावी.
हेही वाचा :Maharashtra Politics: राज्यपालांनी घटना पायदळी तुडवली-अभिषेक सिंघवी यांचा युक्तीवाद