हैदराबाद -दिवाळीचा सण म्हटला की सर्वांसाठी एक आनंदाचे पर्व असते. वर्षानुवर्षे अखंडपणे ही दिवाळी सण साजरा करण्याची परंपरा सुरू आहे. या दिवाळीत विद्यार्थ्यांना सुट्ट्या असतात. सर्वांसाठी नवीन कपडे खरेदी केले जातात. वेगवेगळ्या प्रकारचा फराळ केला जातो. मिठाई आणि इतरही पदार्थ बनवले जातात. सगळीकडे आनंदाचे वातावरण असते. मात्र, यासोबतच दिवाळीच्या या धावपळीत आरोग्यास धोका संभावण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. मग अशावेळी काय काळजी घ्यावी, याबाबत ईटीव्ही भारतचा हा विशेष रिपोर्ट.
दिवाळीत चांगले खाद्यपदार्थ आणि मिष्टान्न खाल्ल्याचा आनंदच. मात्र, ते किती खावे हे तितकेच महत्त्वाचे आहे. मोजक्या प्रमाणात हे पदार्थ खाल्ल्यास आरोग्यास धोका संभावत नाही. तसेच यादरम्यान, व्यायामही फार महत्त्वाचा आहे. त्यामुळे व्यायामासाठी कधीही उशीर करू नका. आपल्या दैनंदिन दिनचर्यामध्ये कसरतचे थोडे बारकावे जोडणे हा एक उत्तम पर्याय आहे. 45-60 मिनिटे वेगवानपणे चालल्यामुळे पचनशक्ती मजबूत राहण्यास मदत होते. तसेच वर्कआउट्सद्वारेदेखील फायदा होऊ शकतो.
खाण्याबाबत खबरदारी -
आपण अनेकदा आपल्या आवडीच्या मिठाई आणि चवदार पदार्थांवर ताव मारतो. मात्र, निरोगी राहण्यासाठी पदार्थ योग्य प्रमाणात खाणे महत्त्वाचे आहे. संयम आणि आरोग्यदायी अन्न हे नियम पाळलेच गेले पाहिजेत. जेवणासाठी बाहेर जाण्यापूर्वी फळे किंवा ताजी भाज्या किंवा फ्रूट स्मूदी किंवा सॅलड आणि सूपचा थोडासा भाग घ्या. हे फक्त तुम्हाला पोट भरणार नाही, तर ते तुम्हाला माफक प्रमाणात खाण्यास मदत करेल. पार्टी किंवा ऑफिशियल डिनर/लंचमध्ये असताना प्रत्येक गोष्टीचा आस्वाद घेऊ नका. योग्य त्या प्रमाणातच खा.