महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Coronavirus : झोपडपट्टीत 'सोशल डिस्टन्स' कसा ठेवणार? - पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान मोदी यांनी लोकांमध्ये सोशल डिस्टन्स पाळण्याचे आवाहन केले आहे. मात्र, गर्दीच्या झोपडपट्टीत घरातून बाहेर पडल्यानंतर एकच जण तेथील गल्लीतील रस्त्यावरून बाहेर पडू शकतो, अशा ठिकाणी कसे सोशल डिस्टन्स कसे ठेवणार, हा प्रश्न समोर आला आहे.

Social Distance In The Hut
गर्दीच्या झोपडपट्टीत 'सोशल डिस्टंस' कसे ठेवणार

By

Published : Mar 26, 2020, 8:56 PM IST

मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी कोरोना व्हायरसपासून देशाला वाचविण्यासाठी पुढच्या 21 दिवसांसाठी 'भारत लॉक डाऊन'ची घोषणा केली आहे. त्यानंतर मंगळवारी मध्यरात्रीपासून या लॉक डाऊनची अंमलबजावणी सुरू झाली आहे. दरम्यान पंतप्रधान मोदी यांनी लोकांमध्ये सामाजिक अंतर ठेवण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार लोक जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांसमोरही सोशल डिस्टन्स पाळला जात आहे. मात्र, मुंबईतील गर्दीच्या झोपडपट्टीत सोशल डिस्टन्स कसा ठेवणार? हा प्रश्न सर्वांसमोर आहे.

गर्दीच्या झोपडपट्टीत 'सोशल डिस्टन्स' कसे ठेवणार?

पंतप्रधान मोदी यांनी लोकांमध्ये सोशल डिस्टन्स पाळण्याचे आवाहन केले आहे. मात्र, गर्दीच्या झोपडपट्टीत घरातून बाहेर पडल्यानंतर एकच जण तेथील गल्लीतील रस्त्यावरून बाहेर पडू शकतो, अशा ठिकाणी कसे सोशल डिस्टन्स कसे ठेवणार, हा प्रश्न समोर आला आहे. त्यामुळे एखादा कोरोना सारखा जीवघेणा संसर्गजन्य रोग झोपडपट्ट्यांमध्ये लगेच पसरू शकतो. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव झोपडपट्ट्यांमध्ये टाळणे सरकारपुढे फार मोठे आव्हान असणार आहे.

हेही वाचा -कोरोनामुळे देशभरातील 15 लाख 62 हजार घरांचे बांधकाम 'लॉकडाऊन'

भारतात आतापर्यंत 600हून अधिक कोरोणाचे रुग्ण आढळले आहेत. यामध्ये महाराष्ट्रात 125 रुग्ण आढळले आहेत. त्यातील 3 रुग्ण हे झोपडपट्ट्यांमधील आहेत. यामध्ये आज मुंबईतील गोवंडी या झोपडपट्टीतील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, झोपडपट्ट्यांमध्ये लाखो लोक राहतात. तसेच ते दररोज सार्वजनिक शौचालयाचा वापर करतात. तसेच पाणी भरताना आणि अत्यावश्यक सेवा खरेदी करताना, घरीच राहत असताना एकमेकांशी त्यांचा संपर्क येतोच. त्यामुळे झोपडपट्ट्यांमध्ये हा संसर्ग अधिक पसरण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.

आशिया खंडातील पहिल्या क्रमांकाची धारावी, कांदिवली येथील गणपत पाटील नगर, घाटकोपर येथील असल्फा आणि रमाबाई आंबेडकर नगर, कामराज नगर, वांद्रे तेथील बेगमपाडा, या झोपडपट्टीत लाखोची लोकसंख्या आहे. या ठिकाणी लॉकडाऊन आहे. तरीही लोक रस्त्यांवर फिरताना दिसतात. एकत्र पाणीपुरवठा आणि सार्वजनिक शौचालयात दररोज हजारोंच्या संख्येने वापर करतात. त्यामुळे जर झोपडपट्टी भागात हा संसर्ग अधिक पसरला, तर कोरोनाला रोखणे सरकारला जड जाणार आहे, यात कोणतीही शंका नाही.

हेही वाचा -'...म्हणून राज्यातील मालवाहू ट्रक वाहतुकीला परवानगी; खासगी संस्थांद्वारे कम्युनिटी किचनचा निर्णय'

ABOUT THE AUTHOR

...view details