मुंबई -कोरोनाची गंभीर परिस्थिती, मुलांमधील वाढता प्रादुर्भाव, तिसऱ्या लाटेची शक्यता इत्यादी बाबी विचारात घेऊन राज्य सरकारने महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी आणि बारावीची परीक्षा रद्द केली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयांचे स्वागत पालक आणि शिक्षण तंज्ञानाकडून करण्यात आले आहे. मात्र, बारावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन कसे करावे, याबाबत शासनाने आपली भूमिका तत्काळ स्पष्ट कारण्याची मागणी केली आहे.
राज्य सरकारच्या निर्णयाचे स्वागत -
कोरोनाची सध्याची परिस्थिती व आजारांचा मुलांवर होणारा वाढता प्रार्दुभाव आणि परीक्षेचा संभ्रमामुळे विद्यार्थ्यांच्या मनात वाढलेला तणाव विचारात घेता केंद्र सरकारने सीबीएसई बोर्डाची बारावी परीक्षा रद्द केली आहे. आता त्याच पाठोपाठ आज महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. या निर्णयांचे स्वागत शिक्षण तज्ञांकडून आणि पालक वर्गाकडून केला जात आहे. तसेच बारावीच्या विद्यार्थ्यांचे पुढचं शिक्षन घेण्यासाठी राज्य शासनाकने लवकरात लवकर मूल्यमापनाचे धोरण व निकालाची तारीख लवकरच जाहीर कारण्याची मागणी केली जात आहे.
विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये -
महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी 'ईटीव्ही भारत'ला सांगितले की, राज्य सरकारने बारावी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय हा स्वागताहार्य आहे. बारावी परीक्षा रद्द करण्याची भूमिका महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषेदेने या अगोदरच मांडली होती. विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांच्या आरोग्याचा दृष्टिकोनातून निर्णय योग्य आहेत. परंतु पुढील काळात बारावीच्या विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, अशा पद्धतीने विद्यार्थ्यांचे मूल्यमापन योग्य पद्धतीने आणि सर्वमान्य झाले पाहिजे आहे, अशी आमची आशा आहेत. इंडिया व्हाईड पेरेंट्स असोसिएशनचे अनुभा श्रीवास्त यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा दृष्टिकोनातून राज्य सरकारने योग्य निर्णय घेतला आहे. आम्ही या निर्णयाचे स्वागत करतो आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणासाठी राज्य सरकारने तत्काळ विद्यार्थ्यांचे मूल्यमापनाचे धोरण व निकालाची तारीख लवकरच जाहीर करावी. जेणेकरून विद्यार्थांना पुढील शिक्षणाचे नियोजन करणे शक्य होईल.