नवी दिल्ली : आता इपीएफओ खात्यात जमा झालाय की नाही हे तुम्ही अनेक मार्गांनी पाहू ( EPFO information ) शकता. उमंग ॲप, ईपीएफओ पोर्टल, एसएमएस द्वारे इपीएफओ तुम्ही पाहू शकता
इपीएफओ खात्यात व्याज जमा : जे सदस्य अजूनही त्यांच्या भविष्य निर्वाह निधी पीएफ खात्यांमध्ये व्याज जमा करण्याची वाट पाहत ( Interest credited to EPFO account ) आहेत. त्यांना ते आजपासून मिळण्याची शक्यता आहे. आयकर कपातीसाठी सॉफ्टवेअर अपग्रेडेशन पूर्ण झाले आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना ईपीएफओ आता सदस्यांच्या खात्यात व्याज जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्याची शक्यता आहे.
उमंग ॲपद्वारे : उमंग ॲप आपल्या वापरकर्त्यांना एकाच प्लॅटफॉर्मवर विविध सरकारी सेवा वापरण्याची सवलत ( EPFO information through Umang app ) देते. हे वापरकर्त्यांना त्यांचे ईपीएफ पासबूक पाहण्याची सवलत दोतात. त्याशिवाय इपीएफओवर क्लेम करू शकतात. त्यांच्या क्लेमचा मागोवा घेण्यास अनुमती असते. ज्यांना उमंग अॅपद्वारे सेवांचा लाभ घ्यायचा आहे. त्यांनी प्रथम अॅप डाऊनलोड करावे. त्यानंतर तुमचा फोन नंबर टाकून सुरुवात करावी. नोंदणी पूर्ण करावी त्यानंतर सेवांचा उपभोग घ्यावा.