महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Feb 22, 2021, 7:06 AM IST

ETV Bharat / state

तिराच्या उपचारासाठी कामत दाम्पत्याने कसे जमा केले 16 कोटी रुपये? जाणून घ्या काय आहे 'क्राऊड फंडिंग'

मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात तीरा कामत नावाच्या मुलीवर उपचार सुरू आहेत. तीरा एसएमए टाइप-१ या आजाराशी झगडत आहे. तिच्या उपचारांसाठी तिच्या पालकांनी क्राऊड फंडिंगच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये उभे केले आहेत.

Tira Kamat treatment
तिरा कामत उपचार

मुंबई - लहानग्या तिरा कामत या मुलीला 'स्पायनल मस्क्युलर ऍस्ट्रॉफी' (SMA) या दुर्धर आजाराचे निदान झाले. या आजारांवर औषध म्हणजे एक जीन थेरपीचे इंजेक्शन द्यावे लागणार आहे. त्याची किंमत 16 कोटी रुपये इतकी आहे. मात्र, तिचे आई-वडील असलेल्या कामत दाम्पत्याने ही रक्कम जमा केली आहे. 'क्राऊड फंडिंग'च्या माध्यमातून त्यांनी १६ कोटी रुपये जमा केले. एवढी मोठी रक्कम त्यांनी नेमकी कशा पद्धतीने जमा केली, याबाबत माहिती देणारा ईटीव्ही भारतचा हा विशेष रिपोर्ट...

'क्राऊड फंडिंग'बाबत माहिती देताना सायबर तज्ञ अंकुर पुराणिक
मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात तीरा कामतवर उपचार सुरू आहेत. तीरा एसएमए टाइप-१ आजाराशी झगडत आहे. तज्ज्ञांच्या मते या आजारामुळे बाळाचे आयुष्य केवळ 18 महिन्यांपर्यंत असू शकते. या चिमुकलीला वाचवण्यासाठी उपचार उपलब्ध आहेत मात्र, ते विदेशात असून खूपच महागडे आहेत. अमेरिकेत उपलब्ध असलेले इंजेक्शन तीराच्या उपचारांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. हे इंजेक्शन लवकरात लवकर उपलब्ध करून देणे गरजेचे होते. कामत दाम्पत्य मध्यमवर्गीय आहे. मात्र, एवढी मोठी रक्कम पाहून त्यांनी हार मानली नाही. पैसे कसे जमा होतील यासाठी त्यांनी दिवस-रात्र एक केला. यातूनच त्यांना 'क्राऊड फंडिंग'चा पर्याय मिळाला. या पर्यायाचा उपयोग करून त्याने ही भली मोठी रक्कम तिराच्या उपचारासाठी जमा केली आहे. 'क्राऊड फंडिंग'च्या माध्यमातून फक्त भारतातूनच नाही तर देशाच्या बाहेरून देखील कामत दाम्पत्याला मोठी मदत झाली आहे.

पैसे जमा करण्यासाठी खूप मेहनत करावी लागली -

आमच्या मुलीच्या उपचारासाठी लागणारा जो पैसा आहे तो पैसा आम्ही क्राऊड फंडिंग या पर्यायचा वापर करून जमा केला आहे. यासाठी आम्ही 'इम्पॅक्टगुरू' आणि 'गो फंड मी' या वेबसाईटचा वापर केला. मदत मागताना आम्ही तिराची माहिती लोकांना सोप्या भाषेत समजावून सांगितली. लोकांना आमची बाजू समजली आणि त्यांनी आम्हाला मदत करण्यास सुरुवात केली. यात कोणतेही रॉकेट सायन्स नाही फक्त मेहनत खूप करावी लागली, असे तिराचे वडील मिहीर कामत यांनी सांगितले.

'क्राऊड फंडिंग' नेमके काय आहे ?

इक्विटी (भागभांडवल) या प्रकारात, कंपनीच्या भागभांडवलाच्या मोबदल्यात छोट्या गुंतवणूकदारांकडून भांडवलाची उभारणी केली जाते. प्रामुख्याने 'स्टार्टअप्स' याचा वापर करतात.
डोनेशन (आर्थिक सहकार्य) या प्रकारात लोकांकडून प्रामुख्याने सामाजिक अथवा वैयक्तिक उपयोगासाठीसुद्धा (उदा: शिक्षण, वैद्यकीय उपचार किंवा विशिष्ट कामासाठी
आर्थिक सहकार्य) पैसे जमवले जातात. पैसे देणाऱ्यांना यातून आर्थिक मोबदला मिळत नाही.

क्राऊड नंतरचा क्लाऊड फडिंग हा देखील पर्याय -

'क्राऊड फंडिंग'ला काही मर्यादा आहेत. मात्र, क्लाऊड फंडिंगला अशा कोणत्याही मर्यादा नाहीत.

फसवणुकीपासून सावध राहा -

क्लाऊड फंडिंगमध्ये आर्थिक सहाय्य सोडल्यास बाकी गुंतवणुकीमध्ये फायदाच फायदा आहे, यामुळे सायबर क्राईम देखील वाढले आहे. यामुळे वापरकर्त्याने सावध राहणे गरजेचे आहे.

काय काळजी घ्याल -

क्राऊड फंडिंगमध्ये पैसे जमा करताना ती व्यक्ती खरी आहे की नाही, हे तपासणे आवश्यक आहे. तिचा आयडी चेक करणे, त्या व्यक्तीने जी आयडिया त्याच्या व्यवसायासाठी किंवा मदत मागण्यासाठी वापरली आहे ती योग्य आहे की नाही, हे तपासणे आणि त्यानंतरच पैसा गुंतवणे योग्य राहील.

ABOUT THE AUTHOR

...view details