मुंबई- झोपडपट्टीमध्ये घरे असणाऱ्यांना आता दिलासा देण्यासाठी नवीन निर्णय घेण्यात येणार असून एसआरए प्रकल्पातील घर आता झोपडी पाडल्यापासून पाच वर्षांनी विकता येणार आहेत. अनेक वेळा प्रकल्प पूर्ण व्हायला वेळ लागत असतो. त्यामुळे झोपडी पडल्यानंतर पाच वर्षाने ते घर विकण्याची मुभा एसआरए देणार असल्याचे संकेत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिले आहेत.
मुंबईला मोठी किनारपट्टी लाभलेली आहे. त्या किनारपट्टीवर अनेक ठिकाणी झोपडपट्ट्या आहेत. खास करुन दक्षिण मुंबईतील कफ परेडच्या बधवार पार्क येथे 32 एकर परिसरात झोपडपट्टी आहे. त्यातील 16 एकरमध्ये 300 चौरस फुटांचे घर झोपडपट्टीवासीयांना दिले, तर इतर जागेवर म्हाडा घरे बांधून ती घरे विकणार आहेत. त्यातून म्हाडाला मोठे उत्पन्न मिळणार आहे. अशा ठिकाणी एसआरए आणि म्हाडा एकत्र येऊन संयुक्तपणे घरबांधणीचा प्रकल्प राबवतील असा विचार आहे, असे मंत्री आव्हाड म्हणाले.
बीडीडी चाळ पुनर्विकासाचा शुभारंभ लवकरच