मुंबई : राज्यातील सर्वसामान्य लोकांच्या मनात असलेला सरकार विषयी असंतोष आणि शासनामध्ये असलेली चलबल चलविचल तसेच तीन उद्योग प्रकल्प राज्यातून बाहेर गेल्याच्या या पार्श्वभूमीवरउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( DCM Devendra Fadnavis ) यांनी आज अनेक प्रकल्पांना विविध अधिकाऱ्यांसोबत मॅरेथॉन बैठका घेत मंजुरी दिलेली आहे. यावेळी राज्याच्या पोलिसांचा गृहप्रकल्प प्रगतीपथावर असून लवकरच 53,860 घरांची बांधणी होणार असल्याची त्यांनी माहिती दिली आहे.
राज्यभरात 457 पोलिसांच्या निवासस्थानाचे प्रकल्प सुरू - राज्यातील पोलिसांच्या घराचा प्रश्न मोठा बिकट आहे. मुंबईसह महाराष्ट्रात पोलीस कर्मचारी ज्या शासकीय निवासस्थानी राहतात, त्यापैकी बहुतांश जुने झालेले आहेत आणि अत्यंत जीर्ण अवस्थेमध्ये इमारती आहेत. तसेच हजारो पोलिसांना शासनाचे निवासस्थान नाही. त्यामुळे या पोलिसांना भाड्याच्या घरात राहावे लागते. या पाश्वभूमीवर महाराष्ट्र राज्यभरात 457 पोलिसांच्या निवासस्थानाचे प्रकल्प सुरू करण्यात येत असून या प्रकल्पामधून 53860 पोलिसांना निवासस्थान मिळणार आहे. पोलीसांच्या शासकीय निवासस्थानाबाबत बाबत विविध विभागाच्या संयुक्त बैठकी घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात ठोस निर्णय जाहीर केला आहे.