महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चेंबूर लाल डोंगर परिसरात घरांच्या भिंतीची पडझड - Mumbai house collapsed news

गेली तीन-चार दिवस सलग पाऊस मोठ्या प्रमाणात मुंबईमध्ये पडत आहे. शुक्रवारी सकाळ पासून सुरु असलेल्या संततधार पावसामुळे दुपारी 12 च्या दरम्यान भिंत कोसळली होती.

चेंबूर लाल डोंगर परिसरात घरांच्या भिंतीची पडझड
चेंबूर लाल डोंगर परिसरात घरांच्या भिंतीची पडझड

By

Published : Jun 12, 2021, 8:11 PM IST

मुंबई - पावसामुळे चेंबूरमधील लाल डोंगर येथे घराच्या भिंतीची पडझड झाली. सर्वेकर नावाच्या मावशीचे ते घर होते. त्या भाजपच्या कार्यकर्त्या आहेत. त्यांना तात्काळ मदत करण्याचे तहसीलदार यांनी आदेश दिले आहेत. सरकारी मदत ही लवकरच मिळेल, असेही सांगण्यात आलेले आहे.

गेली तीन-चार दिवस सलग पाऊस मोठ्या प्रमाणात मुंबईमध्ये पडत आहे. शुक्रवारी सकाळ पासून सुरु असलेल्या संततधार पावसामुळे दुपारी 12 च्या दरम्यान भिंत कोसळली होती. भिंताचा एक बाजूचा कोपरा त्याच्या सर्वेकर मावशीच्या घरावर कोसळला. ही संपूर्ण घटना लाल डोंगर विश्व नगर चेंबूर विश्व गौतम नगर येथे घडली. महाराष्ट्र बेकरीच्या मागे या ठिकाणी सर्वेकर मावशी यांच्या घर होत. शेजार्‍याची भिंत कोसळून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याबाबत चेंबूरचे तहसीलदार यांनी फोन करून तात्काळ तलाठी यांना पाठवून पंचनामा करून शासकीय मदत देण्याबाबत सूचना केलेल्या आहेत. तलाठी आज येऊन पंचनामा करून लवकरच त्यांना शासकीय मदत देतील असे आश्वासनही सर्वेकर यांना देण्यात आलेले आहे. यावेळी स्थानिक कार्यकर्ते यशवंत म्हात्रे, मंदार जोशी, प्रभाकर बोरकर उपस्थित होते. तसेच प्रभाग समिती अध्यक्ष महादेवजी शिवगण यांनी या ठिकाणी भेट घेऊन आवश्यक सूचना अधिकाऱ्यांना दिले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details