मुंबई- मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुख आज विधान परिषदेत निवेदन करणार आहेत. मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी भाजपने मंगळवारी सचिन वाझे यांच्या निलंबनाची मागणी विधानसभेत केली होती. यावरून आठ वेळा सभागृह तहकूब झाले होते. त्यानंतर आज देखील विधानपरिषदेत यावरून गदारोळ होण्याची शक्यता आहे. सकाळी १० वाजता परिषदेच्या कामकाजाला सुरुवात होईल.
सचिन वाझे प्रकरणी गृहमंत्री देशमुख विधानपरिषदेत करणार निवेदन - mansukh hiren death case
मंगळवारी विधानसभेत मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचे पडसाद पाहायला मिळाले. मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वझे त्यांच्यावर आरोप करत वझे यांच्या राजीनाम्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांनी केली. ही मागणी उचलून धरत विरोधकांनी सभागृहात गोंधळ केला. याचे पडसाद मुंबई पोलीस दलातही पाहायला मिळाले.

विरोधकांकडून वाझे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. त्यानंतर आज गृहमंत्री देशमुख वाझे प्रकरणावर विधानपरिषदेत निवेदन करणार आहेत.