मुंबई -स्कॉटलंड यार्डच्या पोलिसांसोबत मुंबई पोलिसांची तुलना केली जाते. मुंबई पोलिसांच्या अनेक कारवायांची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली आहे. मात्र, अभिनेता सुशांतसिंह प्रकरणात मुंबई पोलिसांना विनाकारण लक्ष्य केले जात आहे. यामुळे या विरोधात निवृत्त आयपीएस अधिकाऱ्यांनी एक याचिका दाखल केली आहे, या याचिकेचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्वागत केले आहे.
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले माजी पोलीस अधिकाऱ्यांच्या 'त्या' याचिकेचे स्वागत
राज्यात गेल्या काही महिन्यापासून सुरू असलेल्या सुशांतसिंह मृत्यू प्रकरणात मुंबई पोलिसांवर विविध प्रसार माध्यमे आणि राजकीय पक्ष टीका करत आहेत. काही प्रसारमाध्यमांकडून मुंबई पोलीस दलाची बदनामी करणाऱ्या बातम्या प्रसारित केल्या जात आहेत. या सर्व प्रकाराला प्रतिबंध घालण्यात यावा, अशी विनंती निवृत्त आयपीएस अधिकाऱ्यांनी एका याचिकेद्वारे न्यायालयाला केली आहे.
राज्यात गेल्या काही महिन्यापासून सुरू असलेल्या सुशांतसिंह मृत्यू प्रकरणात मुंबई पोलिसांवर विविध प्रसार माध्यमे आणि राजकीय पक्ष टीका करत आहेत. काही प्रसारमाध्यमांकडून मुंबई पोलीस दलाची बदनामी करणाऱ्या बातम्या प्रसारित केल्या जात आहेत. या सर्व प्रकाराला प्रतिबंध घालण्यात यावा, अशी विनंती निवृत्त आयपीएस अधिकाऱ्यांनी एका याचिकेद्वारे न्यायालयाला केली आहे. राज्याचे माजी पोलीस महासंचालक एम. एन. सिंग, पी. एस. पसरिचा, डी. के. शिवानंदन, संजीव दयाळ, सतीश माथुर व के. सुब्रमण्यम, माजी मुंबई पोलीस आयुक्त डी. एन. जाधव व माजी अतिरिक्त पोलीस महासंचालक के. पी. रघुवंशी यांचा या याचिकाकर्त्यांमध्ये समावेश आहे.
मुंबई पोलिसांच्या संदर्भात निवृत्त अधिकाऱ्यांनी घेतलेल्या भूमिकेचे मी स्वागत केले आहे. महाराष्ट्र व मुंबई पोलिसांची एक वेगळी प्रतिष्ठा आहे. मात्र, सुशांतसिंह प्रकरणात मुंबई पोलिसांना ज्या पद्धतीने विनाकारण लक्ष्य केले जात आहे, ते चुकीचे आहे, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.