मुंबई -उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ इतर राज्यांना मार्गदर्शन करत राहतात. पण, त्यांच्याच राज्यांमध्ये गुंडाराज सुरू आहे. हाथरस येथे एका मुलीवर सामूहिक बलात्कार करुन तिची हत्या झाली. त्यावरून या राज्यात गुंडाराज सुरू असून योगी आदित्यनाथ यांनी आपल्या राज्यात लक्ष घालावे, अशी प्रतिक्रिया गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज (दि. 30 सप्टें.) मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर दिली.
'उत्तर प्रदेशात गुंडाराज सुरू, योगी यांनी आपल्या राज्यात लक्ष घालावे' - मुंबई राजकारण बातमी
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री इतर राज्यांना मार्गदर्शन करतात. पण, त्यांच्याच राज्यात जंगलराज सुरू आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या राज्यात लक्ष घालावे, अशी प्रतिक्रिया राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
सुशांत सिंह राजपूत प्रकरणामध्ये मुंबई पोलिसांनी अतिशय चांगले काम केले चांगला तपासही केला. पण, हे प्रकरण एकाएकी सीबीआयकडे देण्यात आले, पण आम्ही आता सीबीआयच्या अहवालाची वाट पाहत आहोत. सुशांत सिंहची हत्या झाली की आत्महत्या हे त्यांनी स्पष्ट करावे आणि त्याचा अहवाल लवकरात लवकर दिला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. मात्र, यात सुशांत सिंह प्रकरणाचा आधार घेत मागील दोन महिन्यात जे काही महाराष्ट्राला बदनाम करण्याचे राजकारण झाले त्यामध्ये एका राष्ट्रीय पक्षाने एका खालच्या स्तरावर जाऊन हे राजकारण केले असल्याचा आरोप देशमुख यांनी केला.
हेही वाचा -आरे वृक्षतोड : आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश