मुंबई - बॉलिवूडमधील काही नामवंत कलाकारांचे सोशल मीडियावर बनावट फॉलोअर्स बनविण्याचा प्रयत्न काही पीआर एजन्सीकडून केला जात असल्याचे मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने एका कारवाईदरम्यान उघडकीस आणले होते. यासंदर्भात आता महाराष्ट्र पोलिसांकडून सखोल चौकशी केली जाणार असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.
सोशल मीडियावरील बनावट फॉलोअर्सप्रकरणी सखोल चौकशी होणार - गृहमंत्री
बॉलिवूडमधील गायिका भूमी त्रिवेदीचे सोशल मीडियावर बनावट प्रोफाइल असून त्याचे लाखो फॉलोअर्स असल्याची तक्रार तिने स्वतः मुंबई पोलिसांकडे केली होती. यानंतर अभिनेत्री कोयना मित्रा हिने देखील मुंबई पोलिसांकडे तिच्या बनावट सोशल मीडिया प्रोफाइलप्रकरणी तक्रार केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी आतापर्यंत दोन आरोपींना अटक केली असून भारतात अशा प्रकारचे बनावट फॉलोअर्स व लाईक्स बनविणारे १०० वेब पोर्टल व ५४ विदेशी पोर्टल असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने तपासादरम्यान मुंबईतील कुर्ला परिसरातील अभिशेख दौड यास अटक केली होती. हा आरोपी बॉलिवूड क्षेत्रातील काही कलाकारांचे सोशल मीडियावर लाखोंच्या संख्येने बनावट फॉलोअर्स बनवत होता. याप्रकरणात मोठे आंतराष्ट्रीय रॅकेट काम करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. हा आरोपी फ्रांसमध्ये असलेल्या followerskart.com या वेबसाईटसाठी काम करत होता. ज्यात या वेबसाईटच्या क्लाईंटच्या सोशल मीडियावरील प्रोफाइलसाठी बनावट फॉलोअर्स व लाईक्स तयार केले जात होते. अटक आरोपी अभिशेखने आतापर्यंत १७६ आकाऊंटसाठी ५ लाखांहून अधिक बनावट फॉलोअर्स बनविले आहेत.
कसा झाला खुलासा? -
बॉलिवूडमधील गायिका भूमी त्रिवेदीचे सोशल मीडियावर बनावट प्रोफाइल असून त्याचे लाखो फॉलोअर्स असल्याची तक्रार तिने स्वतः मुंबई पोलिसांकडे केली होती. यानंतर अभिनेत्री कोयना मित्रा हिने देखील मुंबई पोलिसांकडे तिच्या बनावट सोशल मीडिया प्रोफाइलप्रकरणी तक्रार केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी आतापर्यंत दोन आरोपींना अटक केली असून भारतात अशा प्रकारचे बनावट फॉलोअर्स व लाईक्स बनविणारे १०० वेब पोर्टल व ५४ विदेशी पोर्टल असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी मुंबई पोलिसांकडून विशेष तपास पथक नेमण्यात आले असून याप्रकरणी बॉलिवूड, क्रीडा क्षेत्रातील काही जणांना चौकशीसाठी समन्स बजाविण्यात आले आहे.