मुंबई- मुंबईत सातत्याने होत असलेल्या मुसळधार पावसामुळे सुरक्षेच्या दृष्टीकोनातून मुंबई उपनगर जिल्ह्यात आज(शनिवार, दि.३) सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. ही माहिती मुंबई उपनगर जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर यांनी दिली.
अतिवृष्टीमुळे मुंबईसह उपनगरात सुट्टी जाहीर - मुंबईत सुट्टी जाहीर
मुंबईत सातत्याने होत असलेल्या मुसळधार पावसामुळे सुरक्षेच्या दृष्टीकोनातून मुंबई उपनगर जिल्ह्यात आज(शनिवार, दि.३) सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.नागरिकांनी आवश्यक असेल तरच बाहेर पडावे, असे आवाहन मुंबई उपनगर जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर यांनी केले आहे.
अतिवृष्टीमुळे मुंबईसह उपनगरात सुट्टी जाहीर
अतिवृष्टी होत असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी मुख्याध्यापक, प्राचार्यांनी आज सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालये बंद ठेवावीत. तसेच, जे विद्यार्थी शाळेत आलेले असतील त्यांना सुखरूप पालकांच्या स्वाधिन करून मगच शाळा सोडावी. असे आदेश शाळांना देण्यात आले आहेत. नागरिकांनी आवश्यक असेल तरच बाहेर पडावे, असे आवाहनही बोरीकर यांनी केले आहे.