मुंबई - दृष्ट आणि वाईट प्रवृत्तीचे नाशकरणारा सण म्हणून होळी साजरी केली जाते. हा सण रंगांचा आणि सर्वांचा आनंद द्विगुणित करणारा आहे. फाल्गुन पौर्णिमेच्या निमित्ताने मुंबईत धारावी, सायन, दादर, माटुंगा लेबर कॅम्प अशा काही ठिकाणी मुहूर्तावर होळी साजरी करण्यात आली.
मुंबईत विविध ठिकाणी होळी उत्साहात साजरी - DHARAVI
दृष्ट आणि वाईट प्रवृत्तीचे नाश करणारा सण म्हणून होळी साजरी केली जाते. हा सण रंगांचा आणि सर्वांचा आनंद द्विगुणित करणारा आहे.
भगवान विष्णु यांचा भक्त असलेला आपला मुलगा प्रल्हाद याच्या वधासाठी हिरण्यकश्यपूने आपली बहिण होलिका हिला बोलविले. त्यावेळी मोठी शेकोटी पेटवून त्याने प्रल्हादला त्यात ढकलले. त्यावेळी होलिकाच्या अंगावर कापड होते. यामुळे हिरण्यकश्यपूने होलिकालादेखील प्रल्हादला शेकोटीत ढकलायला सांगितले. मात्र, त्याचवेळी होलिकाच्या अंगावरील कापड उडून ते प्रल्हादच्या अंगावर बसले. त्यातून प्रल्हाद वाचला व होलिका जळून ठार झाली. होलिकाच्या रुपातील अशा वाईट प्रवृत्तींचा नाश करण्यासाठीच फाल्गुन पौर्णिमेला होळी दहन करण्याची प्रथा आहे. त्यामुळेच मुंबईत ही होळी मोठ्या जल्लोषपूर्ण वातावरणात साजरी केली जाते. संगीत ऐकत, घरी गोड पदार्थ बनवून, मुंबईत घरा घरात होळी साजरी करण्यात येते.