महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दबंग-३ विरोधात हिंदू जनजागृतीचे आंदोलन; आक्षेपार्ह दृष्य हटविण्याची मागणी - Hindu Janajagruti Samiti Agitation Dadar

चित्रपटात साधूंना हातात गितार आणि गॉगल घालून नाचताने दाखविले आहे. त्यामुळे जो पर्यंत ही आक्षेपार्ह दृष्य हटविण्यात येणार नाही. तो पर्यंत आम्ही महाराष्ट्रातच नव्हे तर अख्या भारतात आंदोलन करू असा इशारा हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र प्रवक्ता अरविंद पानसरे यांनी दिला आहे.

mumbai
दबंग-३ विरोधात हिंदू जनजागृतीचे आंदोलन

By

Published : Dec 8, 2019, 2:55 PM IST

मुंबई- येत्या २० डिसेंबरला अभिनेता सलमान खान याचा बहुचर्चित दबंग-३ हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. चित्रपटाचा ट्रेलर पाहून सलमानचे फॅन खूप उत्साहित झाले आहेत. ते आता चित्रपट प्रदर्शित होण्याची आतूरतेने वाट बघत आहेत. मात्र, चित्रपाटातील काही अक्षेपार्ह दृष्यांमुळे भाईजानचा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. दबंग-३ या चित्रपटाविरोधात हिंदू जनजागृती समितीने दादर रेल्वे स्थानकासमोर आंदोलन छेडले आहे.

प्रतिक्रिया देताना हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र प्रवक्ता अरविंद पानसरे

चित्रपटात साधूंना हातात गिटार आणि गॉगल घालून नाचता दाखविले आहे. त्याचबरोबर, श्री.राम आणि कृष्ण यांना आशीर्वाद देताना दाखविण्यात आले आहे. आराध्य देवतांना चित्रपटात चुकीच्या पद्धतीने दाखविण्यात येत असल्याचे समितीचे म्हणने आहे. त्यामुळे जो पर्यंत ही आक्षेपार्ह दृष्य हटविण्यात येणार नाही. तोपर्यंत आम्ही महाराष्ट्रातच नव्हे तर अख्या भारतात आंदोलन करू, असा इशारा हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र प्रवक्ता अरविंद पानसरे यांनी दिला आहे.

तसेच सलमान यांनी चित्रपटातील दृश्यांचे समर्थन केले आहे. चित्रपटातील साधू खोटे आहेत, असे ते म्हणतात. तर मग, सलमान खान चित्रपटात खोटे बिशप आणि मौलवींना का दाखवत नाही, असा सवाल अरविंद पानसरे यांनी केला आहे. त्याचबरोबर, आम्ही सर्वच चित्रपटाचा विरोध करत नसून आमच्या धार्मिक भावना दुखवणाऱ्या चित्रपटांचाच विरोध करतो. आपन याबाबत सेन्सर बोर्डाला पत्रही पाठवल्याचे अरविंद पानसरे यांनी सांगितले.

हेही वाचा-कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे नाव बदलणार? मुख्यमंत्र्यांची राज्यपालांकडे मागणी

ABOUT THE AUTHOR

...view details