महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Hindu Janajagruti Samiti Protest : हलाल सक्ती विरोधात मॅकडोनाल्ड मॉल समोर हिंदू जनजागृती समितीचे आंदोलन - Halal Meat

हलाल (Halal Meat) हे फक्त मुस्लिम खात असल्यामुळे, हिंदू लोकांना हलाल खाण्याची सक्ती (against Halal Meat Force) का या मुख्य मुद्द्यावरुन हिंदू जनजागृती तसेच हलाल सक्तीविरोधी कृती समितीने आज मुंबईतील सायन उपनगरात मॅकडोनाल्ड या (Hindu Janajagruti Samiti protest in front of McDonalds mall) आंतरराष्ट्रीय मॉल पुढे आंदोलन करून, हलाल सक्तीचा निषेध केला.

Hindu Janajagruti Samiti Protest
हिंदू जनजागृतीचे आंदोलन

By

Published : Nov 9, 2022, 6:48 PM IST

मुंबई :हलाल (Halal Meat) हे फक्त मुस्लिम खात असल्यामुळे, हिंदू लोकांना हलाल खाण्याची सक्ती (against Halal Meat Force) का या मुख्य मुद्द्यावरुन हिंदू जनजागृती तसेच हलाल सक्तीविरोधी कृती समितीने आज मुंबईतील सायन उपनगरात मॅकडोनाल्ड या (Hindu Janajagruti Samiti protest in front of McDonalds mall) आंतरराष्ट्रीय मॉल पुढे आंदोलन करून, हलाल सक्तीचा निषेध केला.

हिंदू जनजागृतीचे आंदोलन



हलाल सत्तेविरोधी कृती समितीने (Hindu Janajagruti Samiti) मॅकडोनाल्ड या आंतरराष्ट्रीय मॉल समोर आंदोलन केले आणि मॅकडोनाल्डच्या व्यवस्थापनाला त्यांनी निवेदन देखील दिले. तसेच यावेळी त्यांनी हलाल प्रमाणीकरण वेगळे का केले जाते? अन्नभेसळ प्राधिकरण सर्व उत्पादनांचे प्रमाणीकरण करते. त्यात हलालला समावेश करूनच प्रमाणीकरण करायला हवे. हलालचे स्वतंत्र प्रमाणीकरण करण्याची गरज काय? हा मुद्दा हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी या उपस्थित केला.



यासंदर्भात हलाल शक्ती विरोधी कृती समिती डॉक्टर उदय धुरी यांनी ईटीवी भारत सोबत संवाद साधताना सांगितले की,'मॅकडोनाल्ड या मॉलमध्ये जे हिंदू आहेत, त्यांना हलालची सक्ती का केली जाते. त्यामुळेच इंटरनॅशनल हलाल शो रद्द करण्याची मागणी केली होती. तो कार्यक्रम रद्दही झाला. आणि 80 टक्के हिंदू समाजावर हलाल उत्पादनांची सक्ती आम्ही खपवून घेणार नाही. शासनाने याचा विचार केला पाहिजे', असे म्हणत त्यांनी मॅकडोनाल्डच्या व्यवस्थापकाला निवेदन देखील दिले.



तर या संदर्भात 'हलाल सक्ती विरोधी कृती समिती महाराष्ट्र' यांचे नेते सुनील घनवट यांनी सांगितले की,'भारताबाहेर अमेरिका, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स इत्यादी देशांमध्ये हलाल प्रमाणपत्र आणि हलाल वस्तू यांच्या विक्रीतून मिळणारा पैसा हा घातक कारवांसाठी (Terror Funding) वापरला जातो. त्यामुळेच आम्ही या हाललशक्तीच्या विरोधात उभे आहोत.'

ABOUT THE AUTHOR

...view details