मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील हिमालय पूल (Himalaya Bridge) मार्च २०१९ मध्ये कोसळून ७ जणांचा मृत्यू झाला होता. (Himalaya Bridge on Girder work) या पुलाचे काम सुरू असून नव्या वर्षात रविवारी १ जानेवारीला गर्डर बसवण्याचे काम केले जाणार आहे. (Himalaya bridge collapsed) गर्डर बसवल्यावर इतर कामे दीड महिन्यात होऊन हा पूल नागरिक आणि रेल्वे प्रवासी यांच्यासाठी खुला केला जाणार आहे.
हिमालय पूल :छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडून टाईम्स ऑफ इंडिया, मुंबई पोलीस मुख्यालय, अंजुमन इस्लाम कॉलेज, किल्ला कोर्ट, आझाद मैदान पोलीस स्टेशन याकडे ये- जा करण्यासाठी रेल्वे प्रवासी हिमालय पुलाचा वापर करत होते. १४ मार्च २०१९ रोजी हिमालय पुलाचा मोठा भाग कोसळला (Himalaya bridge collapsed) होता. या दुर्घटनेत ७ जणांचा मृत्यू तर ३२ जण जखमी झाले होते. अंधेरी येथील गोखले पूल कोसळल्यावर हिमालय पूल कोसळला होता. यामुळे पालिकेने मुंबईतील सर्वच पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट केले होते. या ऑडिटनंतर पालिकेने बहुतेक धोकादायक पूल पाडले आहेत. तर काहींच्या कामासाठी निधीची तरतूद केली आहे.
रविवारी गर्डरचे काम:मुंबई शहर समुद्र किनारी असल्याने लोखंडी गर्डर बसवू नये, असा सल्ला देण्यात आला आहे. या अनुषंगाने पालिकेने गर्डर स्टेनलेसस्टीलचे बसवण्याचा निर्णय घेतला आहे. हिमालय पुलाचे पिलर उभे राहिले आहेत. त्यावर बसवण्यासाठी गर्डर आले आहेत. हे गर्डर रविवारी रात्री पिलरवर बसवले जाणार आहेत. यासाठी वाहतूक विभागाच्या परवानगीची वाट बघितली जात आहे. रविवारी गर्डर बसवल्यावर सरकते जिने बसविण्यात येणार आहेत. यामुळे पादचाऱ्यांना पुलावर चढणे व पुलावरून खाली उतरणे सुलभ होणार आहे. पुलाचे उर्वरित काम येत्या एक दीड महिन्यात पूर्ण करून पूल जनतेसाठी खुला करण्यात येणार आहे, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
काय आहे नेमका प्रकार: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील हिमालय पूल (Himalaya Bridge) मार्च २०१९ मध्ये कोसळून ७ जणांचा मृत्यू झाला होता. (Himalaya Bridge on Girder work) या पुलाचे काम सुरू असून नव्या वर्षात रविवारी १ जानेवारीला गर्डर बसवण्याचे काम केले जाणार आहे. १४ मार्च २०१९ रोजी हिमालय पुलाचा मोठा भाग कोसळला (Himalaya bridge collapsed) होता. या दुर्घटनेत ७ जणांचा मृत्यू तर ३२ जण जखमी झाले होते. अंधेरी येथील गोखले पूल कोसळल्यावर हिमालय पूल कोसळला होता. यामुळे पालिकेने मुंबईतील सर्वच पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट केले होते. या ऑडिटनंतर पालिकेने बहुतेक धोकादायक पूल पाडले आहेत. तर काहींच्या कामासाठी निधीची तरतूद केली आहे.