मुंबई -मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ( Chhatrapati Shivaji Maharaj Terminus ) येथील हिमालय पूल ( Himalaya Bridge ) १४ मार्च २०१९ मध्ये कोसळून सात जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर गेल्या तीन वर्षात या पुलाचे बांधकाम पूर्ण झालेले नाही. यामुळे रेल्वे प्रवासी तसेच येथील स्थानिकांना रस्ता ओलांडून प्रवास करावा लागत आहे. मात्र आता पुढील सहा महिन्यात हा पूल प्रवाशांच्या सेवेत असेल अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी दिली.
स्टेनलेस स्टीलचा पूल -मुंबई महापालिकेकडून हिमालय पूल ( Himalaya Bridge from Municipal Corporation ) उभारला जात आहे. लोखंडी पुलाला पावसाळ्यात गंज पकडतो. यासाठी आता हिमालय पूल स्टेनलेस स्टीलचा बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. सीएसएमटी स्थानकातून १ नंबर प्लॅटफॉर्मवरून ठाणे बाजूने बाहेर आल्यावर आझाद मैदान पोलीस ठाण्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर सरकते जिने बसवण्यात येणार आहेत. याच उपयोग जेष्ठ नागरिकांसह गरोदर महिलांना होईल. पुलाच्या पिलर उभारण्याचे काम सुरु आहे. स्टेनलेस स्टिलचा गर्डर बनवण्याचे काम सुरु आहे. हा गर्डर आणून पिलरवर ठेवला जाणार आहे असे वेलरासू यांनी सांगितले.