महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jan 1, 2021, 2:52 PM IST

Updated : Feb 1, 2021, 4:58 PM IST

ETV Bharat / state

डिसेंबरमध्ये मुद्रांक शुल्क वसुलीतून राज्याच्या तिजोरीत 2464 कोटी

राज्य सरकारने ऑगस्टमध्ये मुद्रांक शुल्क दरात 3 टक्क्यांनी घट केल्याने घरखरेदीकडे ग्राहकांचा कल वाढला. त्यामुळेच डिसेंबरच्या एका महिन्यात राज्यात 2 लाख 55 हजार 510 घरे विकली गेली आहेत. यातूनच सरकारला मुद्रांक शुल्क रूपाने 2212 कोटीचा महसूल मिळाला आहे. कोरोना काळात सरकारच्या महसुलात मोठी घट झाली होती. अशा वेळी डिसेंबरमध्ये मिळालेल्या या महसूलामुळे सरकारला ही दिलासा मिळाला असेल.

राज्य सरकारच्या तिजोरीत 2020 मधील सर्वाधिक महसूल
राज्य सरकारच्या तिजोरीत 2020 मधील सर्वाधिक महसूल

मुंबई - बांधकाम क्षेत्रासाठी 2020 वर्षे जाता जाता नवसंजीवनी देणारे ठरले आहे. वर्षाच्या शेवटच्या महिन्यात रेकॉर्ड ब्रेक घरविक्री झाली आहे. तर भाडे करारासह इतर व्यवहार ही मोठ्या प्रमाणावर झाले आहेत. परिणामी या महिन्यात राज्य सरकारला या व्यवहारातून मुद्रांक शुल्क वसुलीच्या रूपाने तब्बल 2464 कोटी रुपये इतका महसूल मिळाला आहे. 2020 मध्ये मिळालेला हा सर्वाधिक महसूल आहे.

केवळ घरविक्रीतून 2212 कोटी

राज्य सरकारने ऑगस्टमध्ये मुद्रांक शुल्क दरात 3 टक्क्यांनी घट केल्याने घरखरेदीकडे ग्राहकांचा कल वाढला. त्यामुळेच डिसेंबरच्या एका महिन्यात राज्यात 2 लाख 55 हजार 510 घरे विकली गेली आहेत. यातूनच सरकारला मुद्रांक शुल्क रूपाने 2212 कोटीचा महसूल मिळाला आहे. कोरोना काळात सरकारच्या महसुलात मोठी घट झाली होती. अशा वेळी डिसेंबरमध्ये मिळालेल्या या महसूलामुळे सरकारला ही दिलासा मिळाला असेल.

हेही वाचा -संत ज्ञानेश्वर माऊली पालखी महामार्गासाठी १०० हेक्टर क्षेत्र संपादित : प्रांताधिकारी-सचिन ढोले


एप्रिलमध्ये सर्वात कमी 3 कोटी 94 लाख इतका महसूल

मार्चपासून राज्यात कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू झाले. परिणामी मालमत्ता खरेदी-विक्री व्यवहार ठप्प झाले. त्यामुळे इतिहासात पहिल्यांदा राज्याला मुद्रांक शुल्क वसुलीतुन सर्वात कमी 3 कोटी 94 लाख रुपये इतका महसूल मिळाला. पण जसजसा महाराष्ट्र अनलॉक होत गेला तसतसा महसूल वाढत गेला. त्यामुळेच जूनमध्ये 833 कोटी, जुलै मध्ये 933 कोटी महसूल मिळाला. हा महसूल पुढे वाढत जाऊ लागला. त्यानंतर ऑगस्टच्या अखेरीस मुद्रांक शुल्क दरात 3 टक्के कपात राज्य सरकारने केली आणि मग मुद्रांक शुल्क वसुली विक्रमी वाढू लागली. त्यामुळेच सप्टेंबरमध्ये 937 कोटीचा महसूल मिळाला. 5 टक्क्यांऐवजी 2 टक्के दराने वसुली झाली असतानाही हा महसूल खूपच मोठा ठरला. पुढे ऑक्टोबरमध्ये 1 हजार 219 कोटींपर्यंत महसूल गेला. तर आता डिसेंबरमध्ये चक्क 2464 कोटी इतका महसूल मिळाला आहे. यावेळी एक बाब लक्षात घ्यावी लागेल की केवळ 2 टक्के दराने मुद्रांक शुल्क वसुली झाली आहे.

2464 कोटीपैकी 751 कोटीची वसुली एकट्या मुंबईतून

2464 कोटींचा महसूल सरकारला डिसेंबरमध्ये मिळाला असून ही दिलासादायक बाब आहे. त्याचवेळी महत्त्वाची बाब म्हणजे या 2464 कोटी पैकी 751 कोटीचा महसूल एकट्या मुंबईने दिला आहे. डिसेंबरमध्ये मुंबईत 19 हजारापेक्षा अधिक घरे विकली गेली असून इतर व्यवहार ही मोठ्या संख्येने झाले आहेत. त्यामुळेच 751 कोटी रुपये मुंबईतुन मुद्रांक शुल्क वसुलीतून सरकारला मिळाले आहेत.

घरविक्रीबरोबरच भाड्याच्या घरातही वाढ

डिसेंबरमध्ये घरविक्रीने नवा रेकॉर्ड केला असताना भाडेकरारही मोठ्या संख्येने झाल्याचे चित्र आहे. डिसेंबरमध्ये राज्यात तब्बल 75 हजार 268 भाडेकरार झाले आहेत. यातील 22 हजार 434 भाडेकरार हे एकट्या मुंबईतील आहेत. एकूणच घरविक्री, भाडेकरार आणि इतर व्यवहारामुळे 2020 ने जाता जाता सरकारच्या तिजोरीत मोठी भर घातली आहे. आता 2021 मध्ये काय होते हे पाहणे महत्त्वाचे आहे.

हेही वाचा -मह‍ाबळेश्वरच्या बॉम्बे पॉईंटवर मावळत्या सूर्याच्या साक्षीने सरत्या वर्षाला निरोप

Last Updated : Feb 1, 2021, 4:58 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details