मुंबई -मुंबईमध्ये मंगळवारी रात्रीपासून पाऊस पडत आहे. बुधवारी पहाटेपासून पावसाने जोर पकडला होता. सकाळी ५ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत पावसाने मुंबईला झोडपून काढले. यादरम्यान मुंबईमध्ये विक्रोळी, सायन रावळी कॅम्प, चेंबूर या ठिकाणी सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. तर सर्वात कमी पाऊस नरिमन पॉईंट, कुलाबा, मलबार हिल या विभागात पडल्याची नोंद झाली आहे.
पूर्व उपनगरात सर्वाधिक पाऊस -
मुंबईत पहाटे ५ वाजल्यापासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. सायंकाळी ५ वाजेपर्यंत तब्बल १२ तास मुंबईत पाऊस पडत होता. या कालावधीत मुंबई शहर विभागात १३७.८२ मिलीमीटर, पश्चिम उपनगरात १९०.७८ मिलीमीटर तर पूर्व उपनगरात २१४.४४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. मुंबई महापालिकेच्या पाऊस नोंद करणाऱ्या केंद्रांवरची आकडेवारी पाहिल्यास सर्वाधिक पाऊस पूर्व उपनगरात पडला आहे तर सर्वात कमी पाऊस शहर विभागात पडला आहे.
या विभागात सर्वाधिक पावसाची नोंद -
मुंबईच्या पूर्व उपनगरातील विक्रोळी फायर स्टेशन येथे २८५.९० मिलीमीटर, शहर विभागातील सायन रावळी कॅम्प येथे २८२.६१ मिलीमीटर, पूर्व उपनगरात चेंबूर फायर स्टेशन येथे २८०.५२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्या खालोखाल धारावी फायर स्टेशन येथे २७६.९३ मिलीमीटर, अंधेरी येथील मरोळ फायर स्टेशन येथे २७२.१९ मिलीमीटर, अंधेरी येथील के ईस्ट कार्यालय येथे २७१.७६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
या विभागात सर्वात कमी पावसाची नोंद -