मुंबई- कोरोना विषाणूची लागण होऊ नये म्हणून राज्यात १६ जानेवारीपासून लसीकरण सुरू आहे. शनिवार २० फेब्रुवारीपर्यंत राज्यात मुंबई, पुणे आणि ठाणे येथे सर्वाधिक लसीकरण झाले आहे. तर सर्वात कमी हिंगोली, वाशीम, सिंधुदुर्ग आणि उस्मानाबाद येथे लसीकरण झाले आहे. २० फेब्रुवारीपर्यंत ८ लाख ९७ हजार ४१३ लाभार्थ्यांना कोव्हीशिल्ड व कोवॅक्सिन ही लस देण्यात आली आहे. राज्यात लसीकरणादरम्यान कोणत्याही लाभार्थ्यांना दुष्परिणाम झाल्याचे निदर्शनास आले नसल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
एकूण लसीकरण -
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लसीकरणाला सुरुवात झाली आहे. त्याअनुषंगाने शनिवार २० फेब्रुवारी रोजी ७७० केंद्रांवर ३७ हजार ३० आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना कोरोना लस देण्यात आली. त्यापैकी २४,५३४ लाभार्थ्यांना पहिला, तर १२,४९६ लाभार्थ्यांना दुसरा लसीचा दुसरा डोस देण्यात आला. ११ हजार ५० आरोग्य आणि १३ हजार ४८४ फ्रंट लाईन वर्कर लाभार्थ्यांना लसीचा पहिला डोस देण्यात आला. ३६,५३२ लाभार्थ्यांना कोविशिल्ड लसीद्वारे लसीकरण करण्यात आले. ४९८ लाभार्थ्यांना कोवॅक्सिन ही लस देण्यात आली. शनिवारपर्यंत ८ लाख ९७ हजार ४१३ लाभार्थ्यांना लस देण्यात आली.
या जिल्ह्यात सर्वाधिक लसीकरण -
राज्यात २० फेब्रुवारीपर्यंत ८ लाख ९७ हजार ४१३ लाभार्थ्यांना लस देण्यात आली. त्यापैकी राज्य सरकारच्या आकडेवारीनुसार मुंबईत सर्वाधिक म्हणजेच १ लाख ५० हजार ६८६, तर मुंबई महापालिकेच्या आकडेवारीनुसार १ लाख ६९ हजार २७२ लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आहे. तसेच पुणे येथे ८ लाख ८९ हजार ६५६, ठाणे येथे ८२ हजार ७९०, नागपूर येथे ४१ हजार ७९५, नाशिक येथे ३८ हजार ३५५, सातारा येथे ३४ हजार ६५७ इतके लसीकरण झाले. तर सर्वात कमी लसीकरण हिंगोली येथे झाले आहे. हिंगोलीत ६१०६, वाशीम येथे ७३५९, सिंधुदुर्ग येथे ८२४३ तर उस्मानाबाद येथे ९५५३ लसीकरण झाले.
अशी आहे जिल्हानिहाय आकडेवारी -
- अकोला -11882
- अमरावती -20035
- औरंगाबाद- 22707
- बीड -15248
- भंडारा -10252
- बुलढाणा -15732
- चंद्रपूर- 19839
- धुळे- 11667
- गडचिरोली -11582
- गोंदिया -10426
- हिंगोली- 6106
- जळगाव -19936
- जालना -13198
- कोल्हापूर -24661
- लातूर -14984
- मुंबई -150686
- नागपूर 41795
- नांदेड -14715
- नंदुरबार -13623
- नाशिक -38355
- उस्मानाबाद -9553
- पालघर- 23571
- परभणी- 7444
- पुणे -89656
- रायगड -13243
- रत्नागिरी -13063
- सांगली- 23318
- सातारा -34657
- सिंधुदुर्ग -8243
- सोलापूर- 30575
- ठाणे -82790
- वर्धा -17310
- वाशीम -7329
- यवतमाळ -15957
हेही वाचा -दिलासादायक! राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत किंचीत घट