महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महाराष्ट्रात उच्चांकी लसीकरण, ३ लाखांहून अधिक जणांना दिली लस - maharashtra corona news

राज्यात गुरूवारपासून ४५ वर्षांवरील नागरिकांना कोरोनाची लस दिली जात आहे. पहिल्याच दिवशी राज्यातील ३ हजार २९५ लसीकरण केंद्रामध्ये सुमारे ३ लाखांहून अधिक जणांना लस देण्यात आली.

highest corona vaccination in maharashtra on wednesday
महाराष्ट्रात उच्चांकी लसीकरण, ३ लाखांहून अधिक जणांना दिली लस

By

Published : Apr 2, 2021, 12:44 AM IST

मुंबई - राज्यात गुरूवारपासून 45 वर्षांवरील नागरिकांना कोरोनाची लस दिली जात आहे. पहिल्याच दिवशी राज्यातील 3 हजार 295 लसीकरण केंद्रामध्ये सुमारे 3 लाखांहून अधिक जणांना लस देण्यात आली. राज्यात गुरूवारी आतापर्यंतचे सर्वाधिक लसीकरण झाले असून एकाच दिवशी 57 हजार जणांना लसीकरण करून पुणे जिल्हा राज्यात अग्रेसर राहिला आहे. त्यापाठोपाठ मुंबईत देखील 50 हजार जणांचे लसीकरण झाले.

महाराष्ट्राने सर्वाधिक सुमारे 65 लाखांहून नागरिकांना लसीकरण करून देशात पहिल्या क्रमांकात सातत्य राखले आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात देशतात महाराष्ट राज्य पहिल्यापासूनच अग्रसेर राहिले आहे. कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर राज्यात लसीकरणाला वेग देण्यासाठी दररोज तीन लाख नागरिकांचे लसीकरण करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले असून दररोज किमान पावणे तीन लाख नागरिकांना लसीकरण केले जात आहे. गुरूवारी तीन लाखांहून अधिक जणांना लसीकरण करण्यात आले.

मुंबईत गुरूवारी 55 हजार 870 लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे. त्यातील 52 हजार 820 लाभार्थ्यांना पहिला तर 3 हजार 50 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण 12 लाख 8 हजार 997 लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे. त्यात 10 लाख 54 हजार 825 लाभार्थ्यांना पहिला तर 1 लाख 54 हजार 172 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. आतापर्यंत एकूण 2 लाख 48 हजार 101 आरोग्य कर्मचारी, 2 लाख 56 हजार 216 फ्रंटलाईन वर्कर, 5 लाख 64 हजार 96 जेष्ठ नागरिक तर 45 ते 59 वर्षामधील गंभीर आजार असलेल्या 1 लाख 40 हजार 584 लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे.

हेही वाचा -महाराष्ट्रात कोरोनाची परिस्थिती बिकट; संक्रमण साखळी तोडण्याचे यंत्रणेसमोर आव्हान

हेही वाचा -'महाराष्ट्रातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्राने हस्तक्षेप करावा'

ABOUT THE AUTHOR

...view details