महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Dec 29, 2022, 12:05 PM IST

ETV Bharat / state

TET Scam : टीईटी घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करणार; देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत माहिती

राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात ( Nagpur Winter session ) कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांना विरोधकांनी लक्ष्य केल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तारांच्या मदतीला धाव घेतली. टीईटी घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करणार असे देवेंद्र फडणवीस ( High Level Inquiry Will Conduct In TET Scam ) म्हणाले. अधिवेशनात विरोधकांवर फडणवीस आक्रमक झाल्याचे ( Devendra Fadnavis Aggressive in Assembly session ) पहायला मिळाले.

High Level Inquiry Will Conduct In TET Scam
टीईटी घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करणार

टीईटी घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करणार

नागपूर :टीईटी प्रकरणी अब्दुल सत्तार यांच्या मुलींना नोकरी मिळाली नाही. त्यामुळे त्यांच्यावर आरोप करण्याची गरज नाही, असे सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीईटी गैरव्यवहारात अब्दुल सत्तार यांची पाठराखण ( High Level Inquiry Will Conduct In TET Scam ) केली. अब्दुल सत्तार यांनी त्यांच्या मुलींना नोकरी लावण्यासाठी टीईटी घोटाळ्यातील गैरव्यवहाराचा वापर करून घेतल्याचा आरोप आहे. या आरोपावरही फडणवीस यांनी स्पष्टीकरण ( Devendra Fadnavis Aggressive in Assembly session ) दिले.

बॉम्ब सोडा यांच्याकडे लवंगी, फटाकडी नाही : यावेळी विरोधकांना टोला लगावताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “हा पहिला विरोधी पक्ष आहे, जो स्वत:च्या काळातील गोष्टीच भ्रष्टाचार म्हणून बाहेर काढत आहे. अपात्र कंपनींना पात्र करुन टीईटी परिक्षा कोणी घेतली, असा सवाल देवेंद्र फडणवीसांनी उपस्थित करत महाविकास आघाडीवर जोरदार आक्षेप घेतला. "बॉम्ब-बॉम्ब म्हटले आणि लवंगी फटाकडी सुद्धा यांना सापडत नाही आहे," असा टोला लगावत सत्तार यांच्या मुली या पात्रता परीक्षेत अपात्र ठरल्या आहेत. त्यामुळे या प्रक्रियेत त्यांना नोकरी लागलेली नसल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

टीईटी घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी :टीईटी घोटाळ्यात आरोप केल्यानंतर काही आमदारांनी सभात्याग केला. यावर देवेंद्र फडणवीस संतापत म्हणाले की, "टीईटी घोटाळ्यावरून अब्दुल सत्तारांवर आरोप करण्यात येत आहे. पण, त्यांची कोणतीही मुलगी टीईटीअंतर्गत नोकरीला लागली नाही. टीईटी आयुक्तांनी तसा खुलासा केला आहे. पण, कोणत्याही मंत्र्यावर बेछूट आरोप करून निघून जायचं. मात्र, आम्ही सोडणार नाही, तसेच उत्तर देऊ, या घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करू ( High Level Inquiry Will Conduct In TET Scam ) , जे दोषी असतील, ज्यांनी अपात्र लोकांना पात्र करण्याचा कारनामा केला त्यांच्यावर कारवाई होईल.

ABOUT THE AUTHOR

...view details