महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Chhat Puja 2022 : छट पूजेला परवानगी नाकारली; खंडपीठांसमोर दाद मागण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश - छट पूजेला परवानगी नाकारली

छट पूजेचे आयोजन करण्यासाठी मुंबईतील मैदानावर मंडप आणि छठपूजेसाठी कृत्रिम तलाव बांधण्यासाठी दुर्गा परमेश्वर सेवा मंडळाचे ( Durga Parameshwar Seva Mandal ) अध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे नेते यांनी पालिकेकडे परवानगी मागितली होती.

Chhat Puja 2022
Chhat Puja 2022

By

Published : Oct 21, 2022, 6:38 AM IST

मुंबई : नोंदणीकृत सोसायटीला बृहन्मुंबई महानगरपालिकेने ( Brihanmumbai Municipal Corporation ) पत्र पाठवत मैदानावर छट पूजा आयोजित करण्यास परवानगी नाकारली. पालिकेच्या या निर्णयाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या ( Nationalist Congress ) सदस्याने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्याची दखल घेत याचिकाकर्त्यांना सुटटीकालीन न्यायालयाकडे दाद मागण्याचे निर्देश दिले. उत्तर भारतीयांचा छट पूजे येत्या 30 आणि 31 ऑक्टोबर रोजी छट पूजेचे आयोजन करण्यासाठी मुंबईतील मैदानावर मंडप आणि छठपूजेसाठी कृत्रिम तलाव बांधण्यासाठी दुर्गा परमेश्वर सेवा मंडळाचे ( Durga Parameshwar Seva Mandal ) अध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे नेते यांनी पालिकेकडे परवानगी मागितली होती.

मुंबई पोलिसांनी एनओसी देण्यास दिला नकार : 19 ऑक्टोबर रोजी पालिकेकडून पत्र प्राप्त झाले. ज्यात याचिकाकर्त्यांना परवानगी नाकारण्यात आल्याचे म्हटले होते. त्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. पालिकेने अन्य मंडळांना कथितपणे कोणत्याही अर्जाशिवाय आणि केवळ भारतीय जनता पक्षाने पाठवलेल्या पत्राच्या आधारे छट पूजा आयोजित करण्याची परवानगी दिल्याचे याचिकेत नमूद कऱण्यात आले आहे. वाहतूक आणि अग्निशमन विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र असूनही मुंबई पोलिसांनी एनओसी देण्यास नकार दिल्याचा आरोप याचिकेत केला आहे.


सुट्टीकालीन खंडपीठाकडे दाद मागण्याचे निर्देश : त्यामुळे इतर मंडळांना दिलेली परवानगी रद्द करून त्याऐवजी याचिकाकर्त्यांच्या मंडळाला विशिष्ट मैदानावर छठ पूजा करण्याची आवश्यक परवानगी देण्यात यावी अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. सदर याचिकेवर गुरुवारी न्या. आर. डी. धानुका आणि न्या. कमल खता यांच्या खंडपीठासमोर तातडीने सुनावणी पार पडली. तेव्हा खंडपीठाने याचिकाकर्त्यांना सुट्टीकालीन खंडपीठाकडे दाद मागण्याचे निर्देश दिले.


ABOUT THE AUTHOR

...view details