मुंबई - मराठा समाजाला दिलेले आरक्षण न्यायालयात वैद्य ठरल्यानंतर अनेक ठिकाणी मराठा समाजाकडून जल्लोष केला जात आहे. मराठा मोर्चाच्या अनेक सभा आणि मिटिंग ज्या दादरच्या शिवाजी मंदिरामध्ये झाल्या त्या शिवाजी मंदिरबाहेर मराठा नेत्यांनी लोकांना पेढे वाटून, फटाके फोडून आनंद साजरा केला. घेतलं रे घेतलं... आरक्षण घेतल... अशा घोषणा देऊन जल्लोष साजरा करण्यात आला.
घेतलं रे घेतलं... आरक्षण घेतलं... अशा घोषणा देत मराठा नेत्यांनी व्यक्त केला आनंद - dission
मराठा समाजाला दिलेले आरक्षण कोर्टात वैद्य ठरल्यानंतर अनेक ठिकाणी मराठा समाजाकडून जल्लोष केला जात आहे. मराठा मोर्चाच्या अनेक सभा आणि मिटिंग ज्या दादरच्या शिवाजी मंदिरामध्ये झाल्या त्या शिवाजी मंदिरबाहेर मराठा नेत्यांनी लोकांना पेढे वाटून, फटाके फोडून आनंद साजरा केला.
मराठा नेत्यांनी व्यक्त केला आनंद
आज उच्च न्यायालयात मराठा आरक्षण हे वैध ठरवण्यात आले आहे. त्यानंतर सगळीकडे आनंद साजरा केला जात आहे. दादर परिसरात मराठा बांधवांनी एकत्र येत एकमेकांना पेढा भरवत शुभेच्छा दिल्या. जरी न्यायालयाने आम्हाला 12 आणि 13 टक्के आरक्षण दिले असले तरी आम्ही 16 टक्क्यांसाठी लढा सुरू ठेवणार आहोत. या निकालामुळे मराठा मुलाच्या शिक्षणात येणारा अडथळा दूर होण्यास मदत होणार आहे अशा भावना मराठा कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या आहेत.