मुंबई : भाडे नियंत्रण कायद्याच्या तरतुदी केवळ भाडेकरार करणाऱ्या कोणत्याही घटकांसोबतच लागू होत नाही. तर त्यासोबत व्यावसायिक आणि व्यापारी पद्धतीच्या भाडे करारांना देखील त्या तरतुदी लागू होऊ शकतात. याबाबतचा एक निकाल मुंबई उच्च न्यायालयाकडून नुकताच दिला गेला. ठाणे जिल्ह्यातील एक रुग्णालय आणि एक डेव्हलपर यांच्याबाबत अहवाल मुंबई उच्च न्यायालयामध्ये पोहोचला असताना मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वाचा निकाल दिला आहे.
लवादाकडे वाद जाईल :यापूर्वी भाडे नियंत्रण कायदा तरतुदीनुसार जागेच्या रहिवासी वापराच्या भाडे करारासाठीच लागू होता. पण जागेचा वापर व्यावसायिक भाडेकरारासाठी लागू होत नव्हता. मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय आता दिला आहे. त्यामध्ये भाडे नियंत्रण कायद्यानुसार शासनाने सक्षम प्राधिकारी नेमला आहे. त्यातून आता वाद मिटण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. ठाणे जिल्ह्यातील एका डेव्हलपर्सच्या संदर्भातील हे प्रकरण आहे. पनवेल येथील दोन सदनिका नवी मुंबईतील नील डेव्हलपर यांनी मेडिकल रिसर्च सेंटर रुग्णालयाला दिल्या. त्या दहा वर्षांपूर्वी भाड्याने दिल्या होत्या. त्यांचे वेगवेगळे स्वतंत्र करार केले गेले होते. हे करार तीन वर्षासाठी मुदतीत केले गेले होते. या कराराच्या आधारे जी जागा आहे. ती ताब्यात ठेवण्यासाठी रुग्णालयाने कोणती हरकत घेतली नव्हती. मात्र वाद झाल्यास लवादाकडे वाद जाईल आणि त्यातून मार्ग काढला जाईल अशी देखील तरतूद करारात केली गेली होती.