मुंबई :मुंबई उच्च न्यायालयाने आज निर्देश देत सांगितले की, राज्य सरकार ( State Government for Lack of Family Courts ) न्यायालयांसाठई जागाच उपलब्ध करून देत नसेल, तर त्याची अमंलबजावणी कशी होणार? असा सवाल करीत मुंबई ( Bombay High Court Slams State Government ) उच्च न्यायालयाने सरकारला ( Bombay High Court Reprimanded State Government ) फटकारले. त्यानंतर महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यांत कौटुंबिक न्यायालय स्थापन ( Government Responsible For Lack of Family Courts ) करण्याबाबतच्या मुद्यावर भूमिका स्पष्ट करण्यासाठी राज्य सरकारने तीन आठवड्यांचा वेळ मागून घेतला आहे.
कौटुंबिक न्यायालय कायद्यातील कौटुंबिक न्यायालयाची तरतूद :कौटुंबिक न्यायालय कायद्यात 10 लाख लोकसंख्येसाठी एक कौटुंबिक न्यायालय उभारण्याची तरतूद आहे. मात्र, महाराष्ट्राची आणि विशेषत: मुंबईची लोकसंख्या पाहता कौटुंबिक न्यायालयांची संख्या फारच कमी आहे. त्यामुळे घटस्फोट, पोटगी, कौटुंबिक दाव्यांबाबत दाद मागण्यासाठी कौटुंबिक न्यायालय दिवसेंदिवस कमी पडत आहेत. त्यामुळे जिल्हा पातळीवर कौटुंबिक न्यायालयांची संख्या वाढवण्यात यावी, यासाठी विधी शाखेचा विद्यार्थी तुषार गुप्ता याने वकील मिनाज ककालिया यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे.