मुंबई : एकनाथ खडसे यांनी पुणे येथील भोसरी भूखंड घोटाळा केला. असा आरोप आहे या संबंधिचा गुन्हा रद्द करण्यासाठीची खडसे यांनी याचिका दाखल केलेली आहे. यावर सत्र न्यायालयात आणि मुंबई उच्च न्यायालयात देखील वेगळे वेगळे खटले सुरू आहेत. मुंबई उच्च न्यायालयामध्ये भ्रष्टाचार प्रतिबंधात्मक कायद्यानुसार त्यांच्यावर पुणे पोलिसांनी केलेली कारवाई आणि गुन्हा आहे. तो रद्द करण्या संदर्भातली त्यांची याचिका होती.
यासंदर्भात आज अल्पावधीतच सुनावणी आटोपली एकनाथ खडसे यांना त्यामुळे दोन आठवडे दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने दोन्ही पक्षकारांची भूमिका ऐकून घेत असताना एकनाथ खडसे यांचे वकील शिरीष गुप्ते यांनी गुन्हा रद्द करण्याबाबत अनेक मुद्दे मांडण्याचा प्रयत्न केला. परंतु या संदर्भात दोन्ही पक्षकारांच्या भूमिका समजून घेतल्यानंतर न्यायमूर्ती एस गडकरी आणि न्यायमूर्ती शिवकुमार दिघे यांचे खंडपीठ निकाल देणार होते. परंतु खडसे यांच्या वकिलांच्या छातीमध्ये अचानक दुखू लागले त्यामुळे त्यांना तातडीने दवाखान्यात जाणे अत्यावश्यक असल्याची बाब न्यायालयाने हेरली.