मुंबई :याप्रकरणी प्रितम देसाई या विधी शाखेच्या विद्यार्थ्यानं याचिका दाखल (Petition challenging decision to drop names) केली होती. मात्र या प्रकरणी जनहित याचिका कशी दाखल होऊ शकते? विद्यार्थ्यांना जनहित याचिका दाखल करायचीच असेल तर, अन्यही अनेक विषय आहेत. त्यामुळे ही निव्वळ प्रसिद्धीसाठी केलेली याचिका असल्याचं प्रथमदर्शनी दिसत असल्यानं, ती योग्य कशी हे पटवून द्या. अन्यथा तुम्हाला मोठा आर्थिक दंड आकारू असा इशारा देताच याचिकाकर्त्यांनी याचिका बिनशर्त मागे (Cordelia Cruise drugs case withdrawn) घेतली. त्यामुळे आर्यन खानला मोठा दिलासा (High Court relief to Aryan Khan) मिळाला आहे.
एनसीबीनं केली होता क्लीन चीट जाहीर : तपासयंत्रणेनं चुकीच्या पद्धतीनं आपल्या अधिकारांचा गैरवापर करत आर्यनसह काही नावं या प्रकरणातून वगळल्याचा आरोप याचिकेतून करण्यात आला होता. तसेच या प्रकरणात पुन्हा सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी या याचिकाद्वारे करण्यात आली होती. एनसीबीनं आर्यन खानसह 6 जणांची नावं आपल्या आरोपपत्रातून वगळली होती. एनसीबीकडून आरोपपत्रात आर्यन खान, आविन साहू, गोपाळ जी आनंद, समीर सेहगल, भास्कर अरोडा, मानव सिन्हा यांना क्लीन चिट देण्यात आली होती. या प्रकरणात आर्यन खान जवळपास महिनाभर तुरुंगात होता. मुंबई सत्र न्यायालानं जामीन नाकरल्यानंतर अखेर हायकोर्टानं आर्यन खानला जामीन दिला होता. त्यानंतर या प्रकरणाचा तपास मुंबई एनसीबीकडून काढून घेतला आणि एकेदिवशी आर्यन खानला पुराव्यांअभावी दिल्ली एनसीबीनं मे 2022 मध्ये क्लीन चीट जाहीर होती.