मुंबई :Thackeray Vs Shinde : पूर्वीच्या शिवसेनेमध्ये बंद झाल्यानंतर राज्यात सत्ता परिवर्तन देखील झाले आहे. त्यानंतर शिवसेनेमध्ये दोन गट पडले होते. ठाकरे गट आणि शिंदे गट. पहिले दादर येथील दसरा मेळाव्यावरून वाद तर आता ठाण्यातील दिवाळी पहाटच्या वाद (Thackeray and Shinde group Diwali dawn dispute) मुंबई उच्च न्यायालयात आला होता. यावेळी मात्र शिंदे गटाला मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला (Mumbai HC gives relief to Shinde group) असल्याने यावर्षी शिंदे गट दिवाळी पहाट कार्यक्रम साजरा करणार (permission to Shinde group for Diwali morning program) आहे. (Latest news from Mumbai)
दसरा ठाकरेंचा होता आता दिवाळी शिंदेंची -दसरा ठाकरेंचा होता आता दिवाळी शिंदेंची असे म्हणण्याची वेळ राज्यातील जनतेवर आली आहे. ठाण्यातील दिवाळी पहाटच्या वादावर मुंबई उच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. ठाण्यात दिवाळी पहाटच्या निमित्ताने ठाकरे आणि शिंदे गट पुन्हा आमने आले होते. दोन्ही गटाला ठाणे महापालिकेने दिवाळी पहाट कार्यक्रमाची परवानगी दिली होती. मात्र आता मुंबई हाय कोर्टाने ठाकरे गटाला दणका देत आता फक्त शिंदे गटालाच दिवाळी पहाट कार्यक्रम घेण्याची परवानगी दिली आहे.