मुंबई High Court Orders : बोरवली येथील राज पटेल याच्यावर बोरवली पोलीस ठाण्यात एका घटनेत 2021 मध्ये कलम 354 आणि 354 (अ) नुसार गुन्हा दाखल होता. मात्र, त्याला अमेरिकेतील स्कॉलरशिप मिळूनही त्याचं पुढचं शिक्षण या खटल्यामुळं रखडलं होतं. याविरोधात त्यानं मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांनी बोरवली न्याय दंडाधिकारी यांना खटला सहा महिन्याच्या आत पूर्ण करण्याचे आदेश दिलेत. न्यायालयानं 27 डिसेंबर रोजी यासंदर्भात आदेश पत्र जारी केलंय.
खटला जलद गतीनं पूर्ण होत नसल्यानं याचिका : याचिकाकर्ता राज अरविंद पटेल हा मुंबईतील बोरिवली या ठिकाणी राहतो. 2021 मध्ये त्याच्यावर बोरिवली पोलीस ठाण्यात कलम 354 आणि 354 (अ) नुसार गुन्हे दाखल करण्यात आले होते. यासंबंधित घटना 3 सप्टेंबर 2021 रोजी घडली होती. मात्र बोरिवली न्यायदंडाधिकारी कोर्टात खटला जलद गतीनं पूर्ण होत नव्हता. यामुळं बोरवली कोर्टात खटला जलद गतीनं पूर्ण झाला पाहिजे. अन्यथा अमेरिकेत शिक्षणासाठी मिळालेल्या प्रवेशावर नकारात्मक परिणाम होईल, अशी याचिका त्यानं मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती.
अमेरिकेतील शिक्षणासाठी याचिकाकर्त्याला मिळाला प्रवेश : याचिकाकर्त्याच्या वतीनं वकील इम्तियाज पटेल यांनी बाजू मांडताना सांगितलं की, याचिकाकर्ता अर्जदार हा पदवी उत्तीर्ण झालेला आहे. भारतात त्यानं पदवी उत्तीर्ण केल्यानंतर पुढील शिक्षणासाठी त्यानं अमेरिकेत प्रवेश प्रक्रिया केली. त्याला अमेरिकेत स्कॉलरशिपही प्राप्त झाली. परंतु, त्याचा खटला बोरिवलीच्या न्यायदंडाधिकारी न्यायालयात प्रलंबित असल्यानं त्याच्या प्रवेशात अडथळा निर्माण झाला होता. तसंच त्याच्या जामीना संदर्भातील कोणत्याही अर्जाला बोरवलीच्या न्यायदंडाधिकारी न्यायालयानं आक्षेप घेतलेला नाही. जेव्हा कोर्टाला वाटेल तेव्हा आरोपी हजर होईल. त्यामुळेच त्याला शैक्षणिक भवितव्यासाठी न्याय मिळाला पाहिजे, असा युक्तिवाद याचिकाकर्त्याच्या वकिलांनी केला.
विद्यार्थ्याचं अमेरिकेतील शिक्षण पूर्ण करण्यासाठी कोर्टप्रकरणाचा खोडा, खटल्याच्या लवकर निपटाऱ्याचे हायकोर्टाचे आदेश
High Court Orders : बोरिवलीतील एका विद्यार्थ्याला अमेरिकेतील स्कॉलरशिप मंजूर झालीय. मात्र त्याच्याविरोधात बोरवली न्याय दंडाधिकाऱ्यांसमोर खटला प्रलंबित असल्यानं त्याचं पुढील शिक्षण रखडलं होतं. याविरोधात त्यानं मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
मुंबई उच्च न्यायालय
Published : Dec 28, 2023, 1:03 PM IST
सहा महिन्यांत खटल्याचा निपटारा करा :दोन्ही पक्षाकारांची बाजू ऐकल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांनी या खटल्यात मानवतेच्या आधारे विचार करत विद्यार्थ्याच्या पुढील अमेरिकेतील शैक्षणिक भवितव्यावर परिणाम होऊ नये, म्हणून बोरवली न्याय दंडाधिकारी यांना उच्च न्यायालयाच्या निर्णयापासून सहा महिन्यांत या खटल्याचा निपटारा करण्याचे आदेश दिले आहेत.
हेही वाचा :