महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भाडेकरुची चूक असताना घरमालकाला शिक्षा का? न्यायालयाचे पोलिसांना कडक आदेश - घरमालकाला शिक्षा

High Court News : बेलापूर परिसरात राहणाऱ्या एका भाडेकरुनं बेकायदेशीर कृत्य केल्यानं पोलिसांनी संपूर्ण घरच ताब्यात घेतलं होतं. याविरोधात घरमालकिणीनं न्यायालयात धाव घेतली. याप्रकरणी न्यायालयानं घर, घरमालकिणीच्या ताब्यात देण्याचे आदेश दिले.

High Court News
High Court News

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 18, 2023, 1:51 PM IST

मुंबई High Court News : बेलापूर परिसरात घरमालकानं 2019 मध्ये भाडेकरुला घर भाड्यानं दिलं होतं. भाडेकरुनं काही चूक केल्यानं पोलिसांनी ते घरच ताब्यात घेतलं. याविरोधात 90 वर्षाच्या घर मालकिणीनं न्यायालयात लढा देऊन घर ताब्यात मिळवण्याची ऑर्डर मिळवली. परंतु, तरीही पोलीस घर ताब्यात देत नव्हते. अखेर उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा दिल्यामुळं घरमालकिणीला तिचं घर पोलिसांनी ताब्यात दिलं. बेलापूर न्यायालयाचे न्यायाधीश जे अग्रवाल यांनी याबाबत निर्णय दिला. याबाबतचे आदेशपात पत्र 18 डिसेंबर रोजी न्यायालयाकडून जाहीर करण्यात आले आहे.


भाडेकरूला भाड्यानं दिला होता फ्लॅट : 90 वर्षाच्या घरमालकीण डॉली कात्रक यांनी आपली भाची बेहरोज कपूर हिच्यामार्फत एक मुख्त्यातपत्र केलं होतं. 2019 मध्ये त्यांनी त्यांच्या घरात एका भाडेकरुला राहावयास जागा दिली होती. मात्र भाडेकरुनं दारू पिऊन तिथं काहीतरी बेकादेशीर कृत्य केलं. त्यामुळं पोलिसांनी ती मालमत्ता ताब्यात घेतली होती. पोलिसांनी जेव्हा ती जागा ताब्यात घेतली त्यावेळेला घर मालकीण 90 वर्षाची महिला डॉली कात्रक यांनी आपली भाची हिच्यामार्फत पोलिसांना कायदेशीर नोटीस देऊन कळवलं होतं. संबंधित जागा त्यांच्या मालकीची असून मुख्त्यारपत्र त्यांनी भाचीला दिलेलं आहे. तिथं भाडेकरु राहत होता, चूक भाडेकरूची आहे. परिणामी तुम्ही आमची ताब्यात घेतलेली सील केलेली मालमत्ता आमच्या ताब्यात दिली पाहिजे, 11 सप्टेंबर 2022 रोजी असं पत्रही दिलं होतं.


घर मालकिणीला ताबा देण्यास पोलिसांचा नकार : बेलापूर पोलिसांनी याबाबत कायदेशीर मुद्दा असल्यामुळं काहीही न ऐकता घर मालकाला त्यांचा फ्लॅट ताब्यात देण्यास नकार दिला. हा खटला अखेर बेलापूर जिल्हा सत्र न्यायालयात दाखल झाला. याप्रकरणी न्यायालयाचे न्यायाधीश जे अग्रवाल यांनी 90 वर्षाची महिला डॉली कात्रक घरमालकीण यांच्या बाजूनं निकाल दिला. परंतु, हा निकाल येऊन सुद्धा पोलीस अंमल करत नव्हते. म्हणून पोलिसांना तुम्ही न्यायालयाचा अवमान करता म्हणून अवमान याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्याचा इशारा दिला होता. हा इशारा देताच पोलिसांची तारांबळ उडाली. न्यायालयाचा अवमान होईल या भीतीनं त्यांनी 90 वर्षाच्या घरमालकीण डॉली कात्रक यांना रविवारी 17 डिसेंबर 2023 रोजी पुन्हा ताब्यात दिलं.

काय म्हणाले वकील : यासंदर्भात कायदेशीर लढाई लढणारे वकील प्रेरक चौधरी म्हणाले की, 90 वर्षाच्या डॉली कात्रक यांनी काही काळ भाड्यासाठी तो फ्लॅट दिला होता. भाडेकरुनं काही चूक केली. म्हणून पोलिसांनी तो फ्लॅटच ताब्यात घेतला. त्यामुळं घरमलकीण यांनी बेलापूर न्यायालयात खटला दाखल केला. बेलापूर न्यायालयानं महिलेच्या बाजूनं निकाल दिला. पोलिसांनी फ्लॅट ताब्यात द्यायला पाहिजे होता. मात्र तसं केलं नाही. म्हणून मुंबई उच्च न्यायालयात जाण्याचा आम्ही इशारा दिला. परंतु न्यायालयाचा अवमान होईल म्हणून पोलिसांनी अखेर रविवारी 90 वर्षाच्या मालकीण डॉली कात्रज यांना पुन्हा त्यांच्या फ्लॅटचा ताबा दिला.

हेही वाचा :

  1. दुसऱ्या बायकोचा देखभाल खर्च नवऱ्यानंच भरावा; मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश
  2. 50 वर्षाच्या नराधमानं 13 वर्षाच्या बालिकेला म्हटलं 'हॉट'; न्यायालयानं ठोठावली तीन वर्षाची शिक्षा

ABOUT THE AUTHOR

...view details