महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबई : कफ परेडमधील झोपडपट्टीवासीयांच्या घराचा मार्ग मोकळा - mumbai cuff parade slum news

झोपडीधारकांच्या पुनर्वसनाच्या दोन दशकांपासून रखडलेल्या प्रकल्पाला उच्च न्यायालयाने मंगळवारी हिरवा कंदील दिला आहे.

high-court-gives-green-signal-for-house-of-slum-in-the-cuff-parade-in-mumbai
मुंबई : कफ परेडमधील झोपडपट्टीवासीयांच्या घराचा मार्ग मोकळा

By

Published : Dec 24, 2020, 5:59 PM IST

मुंबई -मुंबईतल्या कफ परेड येथील वर्ल्ड ट्रेड सेंटरजवळील सात हजार झोपडीधारकांच्या पुनर्वसनाच्या दोन दशकांपासून रखडलेल्या प्रकल्पाला उच्च न्यायालयाने मंगळवारी हिरवा कंदील दिला आहे. मुंबईतील कफ परेड क्षेत्रात झोपडपट्टी पुनर्वसन योजने (एसआरए) अंतर्गत या इमारती बांधल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे एसआरए अंतर्गत आतापर्यंत जास्तीत जास्त 22 मजली उंच इमारती बांधण्यात आल्या आहेत. मुंबईचा कफ परेड परिसर हा देशातील सर्वात महागड्या क्षेत्रांपैकी एक आहे.

सर्व झोपडीधारकांना घरे मिळतील -

शापूरजी पालनजी समूहाची उपकंपनी असलेल्या प्रिकॉशन प्रॉपर्टीज या कंपनीची २८ एकर जागेवरील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पासाठी निवड करण्यात आली होती. त्या निवडीला डायना इस्टेट आणि झोपडीधारकांच्या संघटनेने राज्य सरकारच्या तक्रार निवारण समितीकडे आव्हान दिले होते. फेब्रुवारी महिन्यात समितीने शापूरजी पालनजी समूहाची या प्रकल्पासाठी केलेली निवड योग्य ठरवली. त्यामुळे डायना इस्टेटने याविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायमूर्ती नितीन जामदार आणि न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या खंडपीठाने त्यांची याचिका फेटाळली. काही झोपडीधारकांनी प्रस्तावाविरोधात याचिका केल्याने कंपनीचा प्रस्ताव रखडला होता; परंतु ८४ टक्के पात्र झोपडीधारकांच्या सहकारी संस्थांनी कंपनीच्या प्रस्तावाला मान्यता होती. कंपनीची आर्थिक स्थिती लक्षात घेत, हा प्रकल्प पूर्ण होईल तसेच सगळ्या झोपडीधारकांना घरेही मिळतील, असेही न्यायालयाने नमूद केले.

हेही वाचा - मनसे विरुद्ध अ‌ॅमेझोन; दिंडोशी न्यायालयाची राज ठाकरेंना नोटीस

ABOUT THE AUTHOR

...view details