महाराष्ट्र

maharashtra

High Court directs : सचिन वाझे आणि प्रदीप शर्मा यांच्या बैठकींचे CCTV उद्या कोर्टात सादर करण्याचे उच्च न्यायालयाचे NIA ला निर्देश

By

Published : Nov 23, 2022, 9:27 PM IST

मनसुख हिरेन हत्या प्रकरणी ( Mansukh Hiren murder case ) एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या वकिलांनी आरोप पत्रांमधील अनेक मुद्द्यांवर घेतलेल्या हरकती घेतल्यानंतर न्यायाधीश मोहिते डेरे आणि न्यायाधीश आर. एन. लड्डा यांच्या खंडपीठाने यांना उद्या होणाऱ्या सुनावणी दरम्यान सीसीटीव्ही फुटेज खंडपीठांसमोर दाखल ( High Court directs NIA to produce CCTV ) करण्याचे आदेश दिले आहे. आज सुनावणी दरम्यान एनआयच्यावतीने NIA अनिल सिंग यांनी युक्तिवाद केला.

Etv Bharat
Etv Bharat

मुंबई :मनसुख हिरेन हत्या प्रकरणी ( Mansukh Hiren murder case ) एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या वकिलांनी आरोप पत्रांमधील अनेक मुद्द्यांवर घेतलेल्या हरकती घेतल्यानंतर न्यायाधीश मोहिते डेरे आणि न्यायाधीश आर. एन. लड्डा यांच्या खंडपीठाने यांना उद्या होणाऱ्या सुनावणी दरम्यान सीसीटीव्ही फुटेज ( High Court directs NIA to produce CCTV ) खंडपीठांसमोर दाखल करण्याचे आदेश दिले आहे. आज सुनावणी दरम्यान एनआयच्यावतीने NIA अनिल सिंग यांनी युक्तिवाद केला.

न्यायालयात सुनावणी :आज सुनावणी दरम्यान NIA च्या वतीने युक्तिवाद करणारे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग सुनावणी दरम्यान गैरहजर होते. आज या प्रकरणातील आरोपी रियाझ काझी यांच्या वकिलांकडून जामीन अर्जावर युक्तिवाद करण्यात आला आहे. रियाझ काझी हा सहाय्यक पोलीस निरीक्षक असून सचिन वाझे याचा सहकारी आहे. जवळपास दीड वर्षांपासून रियाज काझी तुरुंगात आहे. रियाझ काझी हा सचिन वाझेच्या अधिनस्थ काम करणारे अधिकारी होता. वाझे यांनी लेखी आदेश दिल्यानंतर का यांनी या प्रकरणात लॅपटॉप, सिडीआर आणि इतर साहित्य जप्त केला होता. मात्र पंचनामा केला नाही रियाजवर म्हणून गुन्हा दाखल केला असा युक्तिवाद रियाझ काझी यांचे वकील युग चौधरी यांनी आज न्यायमूर्ती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती आर एन लड्डा यांच्या खंडपीठांसमोर केला आहे.



या अधिकाऱ्यांचा समावेश : आरोपपत्र 9 ते 10 हजार पानांचे असून यात मुंबई पोलीस दलातील अनेक अधिकारी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. बडतर्फ सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे, माजी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा, निलंबित एपीआय रियाझुद्दीन काझी, निलंबित पोलीस निरीक्षक सुनील माने, निलंबित पोलीस हवालदार विनायक शिंदे, नरेश गोर, संतोष शेलार, आनंद जाधव, मनीष सोनी व सतीश तिरूपती मुतकारी यांच्या नावांचा समावेश आहे.




NIA चा दावा काय? : मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा तपास करताना सचिन वाझे यांच्यासोबत सतीश, मनिष आणि प्रदीप शर्मा यांचा सहभाग स्पष्ट झाला. सतीश आणि मनिष यांनी मनसुख हिरेनची हत्या केल्याची कबुली दिली. सचिन वाझे आणि प्रदीप शर्मा यांच्या आदेशानेच त्यांनी मनसुख हिरेनची हत्या केली. हत्येनंतर दोघांनी प्रदीप शर्मा आणि सचिन वाझे यांच्याशी संपर्क साधला होता. या हत्येसाठी दोघा आरोपींना रोख रक्कम देण्यात आली होती असा दावा एनआयएच्या वकिलांनी कोर्टात केला.



कोणत्या कलमाखाली गुन्हे? : या आरोपपत्रामध्ये आरोपींविरुद्ध भादंवि १२०(ब), २०१, २८६, ३०२, ३६४, ३८४, ३८६, ४०३, ४१९, ४६५ तसेच भादंवि ४७१, ४७३ आणि ५०६ कलमान्वये गुन्हे दाखल केलेले आहेत. याचबरोबर शस्त्रास्त्र कायद्याच्या कलम ३ आणि २५ नुसार व स्फोटक पदार्थ कायद्याच्या कलम ४, १६, १८ व २० UP(p) अंतर्गत गुन्हे दाखल केलेले आहेत.




मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण : मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ आढळली होती. ती स्कॉर्पिओ मनसुख हिरेन यांची होती. जी स्कॉर्पिओ अंबानींच्या घराबाहेर सापडली होती त्या गाडीमालकाचा मृतदेह सापडला आहे. मनसुख हिरेन यांचा मृतदेह 5 मार्चला मुंब्रा रेतीबंदर भागात सापडला होता. ही हत्या असल्याचा दावा करत NIA ने सचिन वाझे यांना अटक केली. सध्या ते कोठडीत आहेत. या प्रकरणात आठ आरोपी विरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. हे आठ ही आरोपी न्यायालयीन कोठडीत आहे. मनसुख हिरेन यांची हत्या घडली त्या रात्री नेमकं काय घडलं याचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्या रात्री आरोपींनी हिरेन यांच्या नाकावर जबरदस्ती क्लोरोफॉर्म टाकलं. त्यामुळे हिरेन तात्काळ बेशुद्ध पडले. त्यानंतर आरोपींनी त्यांची हत्या केल्याचं पोस्टमार्टमच्या रिपोर्टनुसार हत्येपूर्वी हिरेन यांच्या चेहऱ्यावर मार लागलेला होता. त्यांच्या चेहऱ्याच्या डाव्या बाजूला मार लागलेला होता. मृत्यूपूर्वी हा मार लागलेला होता. तसेच त्यांच्या अंगावर काही ठिकाणी मार होता. विशेषत डोक्यालाही मार लागलेला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details