महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अपघातामध्ये कायमचे अपंगत्व आल्याने एक कोटींची नुकसान भरपाई द्या- मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश - कायमचे अंपगत्व नुकसान भरपाई

धातू कापणीचे काम पाहणारे याचिकाकर्ते योगेश पांचाळ हे 29 नोव्हेंबर 2004 रोजी दुचाकीवरून मुलुंडमधील सोनापूर बसस्थानकाजवळून जात असताना मागून येणाऱ्या डंपरने त्यांना धडक दिली. अपघातात गंभीर असल्याने ( Justice Anuja Prabhudesai accident compensation ) पांचाळ यांच्यावर महागडे उपचार करण्यात आले. मात्र तसे करूनही त्यांना कायमचे अपंगत्त्व आले.

Mumbai high court order
मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश

By

Published : Oct 25, 2022, 6:45 AM IST

मुंबई: मुंबईतील मुलुंड येथील रहिवासी योगेश पांचाळ ( Yogesh Panchal Sonapur accident ) सोनापूर बसस्थानकाजवळून जात असताना मागून आलेल्या डंपरने धडक दिल्याने त्यांना कायमचे अपंगत्व सहन करावे ( Mumbai high court order on compensation ) लागले. संसारिक, शारीरिक आणि मानसिक त्रास पाहता याचिकाकर्त्याच्या नुकसान भरपाईत वाढ होणे अत्यावश्यक आहे. असे नमूद करून उच्च न्यायालयाने भरपाई रक्कमेत एक कोटी रुपयांपर्यंत वाढ केली आहे.

धातू कापणीचे काम पाहणारे याचिकाकर्ते योगेश पांचाळ हे 29 नोव्हेंबर 2004 रोजी दुचाकीवरून मुलुंडमधील सोनापूर बसस्थानकाजवळून जात असताना मागून येणाऱ्या डंपरने त्यांना धडक दिली. अपघातात गंभीर असल्याने ( Justice Anuja Prabhudesai accident compensation ) पांचाळ यांच्यावर महागडे उपचार करण्यात आले. मात्र तसे करूनही त्यांना कायमचे अपंगत्त्व आले. अपघाताच्या नुकसान भरपाईसाठी पांचाळ यांनी मोटार वाहन अपघात दावा लवादाकडे अर्ज केला. लवादाने त्यांना 48 लाख रुपयांची नुकसान भरपाई 7.5 टक्के व्याजाने देण्याचे निर्देश दिले. मात्र पांचाळ यांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने या निर्णयावर असमाधान व्यक्त करत पांचाळ यांनी उच्च न्यायालयात भरपाईची रक्कम वाढवून देण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली.

याचिकाकर्त्यांचे जीवन पूर्ववत होऊ शकणार नाहीन्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांच्यासमोर नुकतीच सुनावणी पार पडली. पांचाळ यांची बाजू ऐकल्यानंतर या गंभीर अपघातामुळे याचिकाकर्त्यांचे वैयक्तिक आयुष्यात संपूर्णतः बदलले असून कमरेपासून पायापर्यंतचा भाग निकामी झाला आहे. शारीरिक, मानसिक त्रासाचा वैवाहिक जीवनावर परिणाम झाला आहे. पिता म्हणून मुलांच्याप्रती जबाबदाऱ्या, प्रेम, मार्गदर्शनावर मर्यादा आल्या आहेत. आर्थिक भरपाईचा आकडा लाखोंचा असला तरी याचिकाकर्त्यांचे जीवन पूर्ववत होऊ शकणार नाही, असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने नुकसानभरपाईच्या रकमेत अतिरिक्त 64 लाख 86 हजार 715 रुपयांची वाढ केली. येणाऱ्या काळातील वैद्यकीय खर्चाची 23 लाख रुपयांची रक्कम वगळत न्यायालयाने पांचाळ यांची याचिका योग्य ठरवली. त्यांना दिलासा दिला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details