महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Sambhaji Bhide: व्यापक जनहित याचिकेत कुणाचेही नाव नको; मनोहर भिडेंचे प्रतिवादी म्हणून नाव काढून टाका, उच्च न्यायालयाचे निर्देश - Remove Name of Manohar Bhide

राष्ट्रपुरुषांबद्दल अपमानास्पद वक्तव्यांसंदर्भात शिक्षेची तरतूद असणारा कडक कायदा करावा, अशी जनहित याचिका सामाजिक कार्यकर्ते कुमार सप्तर्शी यांनी हायकोर्टात दाखल केली आहे. संभाजी भिडे यांनी अमरावती येथील एका कार्यक्रमात महात्मा गांधी यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या संदर्भातून ही याचिका करण्यात आली होती. त्यामुळे व्यापक जनहित लक्षात घेता कुणाही व्यक्तीचे प्रतिवादी म्हणून नाव नको, असे कोर्टाने स्पष्ट केले. त्यामुळे याचिकेतून भिडे यांचे नाव वगळण्याचे उच्च न्यायालयाने निर्देश दिले आहेत.

High Court
उच्च न्यायालयाचे निर्देश

By

Published : Aug 7, 2023, 8:23 PM IST

मुंबई : संभाजी भिडे यांनी महात्मा गांधींबाबत आक्षेपार्ह आणि अवमानकारक विधान केले होते. त्याविरोधात ज्येष्ठ गांधीवादी समजावादी नेते कुमार सप्तर्षी यांच्या याचिकेवर आज उच्च न्यायालयात सुनावणी झाली. खंडपीठाने त्यावर आज निकाल न देता केंद्र आणि राज्य शासनाने आपली भूमिका लिखित प्रतिज्ञापत्र सादर करत मांडा, असे निर्देश दिले आहेत. तर संभाजी भिडे यांचे नाव याचिकेतून काढा, असे देखील निर्देश न्यायालयाने दिले. कारण ही जनहित याचिका आहे तर जनहित याचिका व्यापक समाजासाठी असते. तेव्हा एका व्यक्ती विशेषाचे नाव असणे उचित नव्हे, असे देखील कोर्टाने म्हटले.




अवमानकारक विधान केले होते: संभाजी भिडे यांच्याकडून महात्मा गांधी यांच्या वडिलांच्या बाबत अत्यंत अवमानकारक विधान त्यांनी नुकतेच केले होते. महात्मा गांधी यांचे वडील मुसलमान असल्याचे विधान केले होते. त्यावर देशात प्रतिक्रिया उमटल्या. भिडे यांचा निषेध व्यक्त केला गेला. राज्याच्या विधिमंडळ अधिवेशनात देखील त्यावर विरोधी पक्ष नेत्यांनी सरकारला सवाल केला होता. त्यात गृहमंत्री फडणवीस यांनी भिडे यांना असे अवमान करण्याचे अधिकार नाही. तसेच कोणालाही तसे अवमानकारक विधान करता येणार नाही असे स्पष्ट केले होते.



मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल : मात्र या संदर्भात ज्येष्ठ गांधीवादी आणि समाजवादी नेते कुमार सप्तर्षी यांनी मात्र एक स्वतंत्र याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली. या याचिकेमध्ये त्यांनी मागणी केली की, राज्यघटनेच्या कलम 51 अ अंतर्गत केंद्र शासनाने, राज्य शासनाने यावर कायदा तयार करण्याची गरज आहे. त्याआधारे नियमावली तयार करून राष्ट्रपुरुषांचा अवमान कोणी करेल तर त्याबाबत कायदा नुसार उचित ती शिक्षा सुनावली जावी. कारण आमचा मतभेद विनायक दामोदर सावरकर यांच्या विषयी आहे. परंतु आम्ही त्यांचा अवमान करत नाही, कधीही करणार नाही. मात्र 83 वर्षाचे मनोहर भिडे सातत्याने महात्मा गांधी यांच्याबाबत अवमान कारक विधान करतात.




उच्च न्यायालयात सुनावणी : यासंदर्भात वकील अ‍ॅडकिरण कदम यांनी सांगितले की, मनोर भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याबाबत अवमानकारक विधान केले होते. महात्मा गांधी यांच्या विचारांचे अनुयायी म्हणून कुमार सप्तर्षी यांनी याबाबत न्यायालयाने कायदा करण्याबाबत नियम करण्याबाबत मार्गदर्शक तत्वे जारी करावे अशी मागणी करणारी याचिका केली होती.

हेही वाचा -

  1. Uddhav Thackeray: त्यांचे गुरुजी असतील तर, कारवाईची अपेक्षा कशी करायची - उद्धव ठाकरे यांचा टोला
  2. Sambhaji Bhide Supporters Rally: विनापरवाना रॅली काढून भिडे समर्थकांचा पोलीस ठाण्यासमोर गोंधळ, 62 जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल
  3. Subodh Savji on Sambhaji Bhide: अन्यथा, मी संभाजी भिडेचा मर्डर करेन- माजी मंत्री आक्रमक, थेट गृहमंत्र्यांना पत्र

ABOUT THE AUTHOR

...view details