मुंबई- मुंब्रा रूग्णालयात घडलेल्या दुर्घटनेच्या संदर्भात प्रशासनावर अतिशय तीव्र भावना व्यक्त करत मुंबई उच्च न्यायालयाने प्रशासनावर ताशेरे ओढले. मुंब्रा रूग्णालयात आग लगून चार लोकांचा बळी जाणे ही गंभीर घटना आहे, अशा कठीण प्रसंगात या घटना वारंवार का घडत आहेत? असा प्रश्न प्रशासनाला उच्च न्यायालयाने यावेळी विचारला. मुंबईतील रूग्णालये ही 'लाक्षागृह' होत चाललीयत का? महाभारतात पांडवांसोबत घडलेल्या घटनेची हल्ली आठवण होऊ लागलीये अशी प्रतिक्रिया न्यायालयाने यावेळी दिली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर याचिका -
कोरोनाच्या अनुषंगाने विविध प्रश्न उपस्थित करणाऱ्या जनहित याचिका न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत. या याचिकांवर मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. यावेळी सुनावणी दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने आदेश प्रशासनाला काही दिले.
कोविड रूग्णांच्या उपचारासाठी पुरेश्या सोयी आवश्यक -