मुंबई :संजय राऊत यांचे निकटवर्तीय असलेल्या प्रवीण राऊतच्या मालकीच्या काही कंपन्या होत्या. त्यातील गुरू आशिष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी पत्राचाळ घोटाळ्याच्या केंद्रस्थानी आहे. या प्रकल्पात संजय राऊत यांनीही खूप स्वारस्य घेतले होते आणि ते प्रवीणला मदत करीत होते. त्यातूनच घोटाळा करून कमावलेल्या पैशांपैकी तीन कोटी २७ लाख रुपये हे संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा यांच्या बँक खात्यात जमा झाले होते. या प्रकारचा आरोप संजय राऊय यांच्यावर ठेवण्यात आला. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने संजय राऊत यांना जामीन दिला. त्या जामीनाला आव्हान अंमलबजावणी संचालयाने दिले आहे. त्या संदर्भातली आजची सुनावणी न्यायमूर्ती बोरकर यांनी तहकूब केली.
घोटाळ्यात सहभाग?: गोरेगावमधील पत्राचाळ (सिद्धार्थनगर) पुनर्विकास प्रकल्पात संजय राऊत यांनी खूप स्वारस्य घेतले होते. मात्र, त्या प्रकल्पाच्या घोटाळ्यात त्यांनी छुप्या पद्धतीने सहभाग घेतला. प्रवीण राऊत याना पुढे करून त्यांनी या घोटाळ्यात भाग घेतला. याप्रकरणी आम्हाला आणखी बराच तपशील मिळत असून, अद्याप तपास सुरूच आहे,' असा आरोप मांडून संजय राऊत यांच्या जामीन अर्जाला अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) विरोध केलाच होता. मात्र, अंमलबजावणी संचालयाने जामीन देताना आपल्या निकाल पत्रामध्ये ईडीवर चिकित्सक शेरे देखील मारले.
राऊतांचा जामीन रद्द करण्याची मागणी : त्यानंतरही अंमलबजावणी संचलनालय यांच्यातर्फे संजय राऊत यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला जामीन तो रद्द करण्या संदर्भातली याचिका दाखल केली होती. या याचीकेच्या संदर्भातील सुनावणी आज न्यायमूर्ती बोरकर यांच्या एकल पिठापुढे सुरू झाली. याचीके संदर्भातला मुद्दा दोन्ही पक्षकारांनी उपस्थित केल्यावर अंमलबजावणी संचनानालय वतीने वकिलांनी संपूर्ण याचिकेसाठी दीड तास आणि काही काळ अवकाश हवा अशी याचना केली. त्यामुळे या प्रकरणाचा तपशील न्यायालयामध्ये व्यवस्थित मांडता येईल असे देखील ईडीवतीने म्हटले गेले. मात्र, न्यायमूर्ती एन बोरकर यांनी सरकारच्या वकिलांची बाजू ऐकून घेऊन," आमच्या पुढे इतक्या याचिकांचा ढीग असल्याचे दर्शवत आपण मागितलेला दीड तास आज हा मिळणे कठीण आहे. त्यामुळे या संदर्भातली सुनावणी 18 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 11 वाजता ठेवण्यात आल्याचे न्यायमूर्तींनी न्यायालयात नमूद केले.
पत्राचा घोटाळा प्रकरण :पत्राचा घोटाळा प्रकरणी संजय राऊत आणि त्यांचे बंधू प्रवीण राऊत यांच्या संदर्भात अनेक आरोप ठेवण्यात आलेले आहेत. या आरोपांच्या अनुषंगाने अंमलबजावणी संचलनाल्याने याचिकेचा पाठपुरावा सुरू ठेवला. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने या संदर्भात संजय राऊत यांना जामीन दिल्यानंतरही अंमलबजावणी संचलनालयाच्या वतीने या जामीनाला विरोध देण्यासाठी भरपूर तयारी केल्याचे एकूणच या सुनावणीच्या दरम्यान स्पष्ट झाले. येत्या 18 फेब्रुवारी रोजी या संदर्भातील नेमके सुनावणी झाल्यावर सगळ्या घटनांचा अंदाज येऊ शकेल.अशी माहिती राऊत यांचे वकील एड विक्रांत साबणे यांनी दिली.
हेही वाचा -Nana Patole Criticized NCP : काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये पुन्हा धुसफूस, विधानपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादीने आघाडीचा धर्म पाळला नाही - नाना पटोले