मुंबई -जगातील सर्वात प्राचीन आणि पहिल्या शतकातील सर्वात जुन्या गणेश मूर्तीची चित्रलिपी जवळून पाहण्याची संधी मुंबईकरांना उपलब्ध झाली आहे. ही चित्रलिपी पहिल्या शतकातील असून ती गुजरात येथील डॉ. प्रकाश कोठारी यांनी संग्रहित करून ठेवली आहे. मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरीत जगातील सर्वात जुन्या या गणेशमूर्ती शिल्पांचे प्रदर्शन सुरू आहे.
जगातील सर्वात जुन्या गणेशमूर्तीची चित्रलिपी पाहण्याची मुंबईकरांना संधी डॉ. कोठारी याबाबत म्हणाले, "या गणेशमूर्तीचे चित्रशिल्प बारा वर्षांपूर्वी मला मुंबईच्या चोर बाजारात मिळाले होते. मला तेव्हा हे इतके प्राचीन असेल असे वाटले नव्हते. नंतर मला त्यावर ब्राम्ही लिपीत काही तरी लिहिल्याचे लक्षात आल्यानंतर मी पुरातत्व खात्याला आणि त्यासाठीचे संशोधन करणाऱ्या मित्रांना ते पाठवले. म्हैसूर आणि इतर ठिकाणच्या संशोधन संस्थांनी हे शिल्प चीनमध्ये असलेल्या सर्वात जुन्या गणेश शिल्पापेक्षा जुने असल्याचे सांगितले. मी देशात अनेक ठिकाणी फिरताना मला पहिल्या ते विसाव्या शतकापर्यंत अनेक गणेशशिल्प मिळाले. या प्रदर्शनात विसाव्या शतकापर्यंतचे 60 शिल्प ठेवण्यात आले आहेत"
त्यांच्याकडे पेशवाचे काळातील श्री गणपती पंतप्रधान, मराठा नाणे ठेवले असून सव्वा चार लाख रुपयांना त्यांनी ते विकत घेतले होते. त्यासोबत अठराव्या शतकातील कोकशास्त्र, तामिळनाडू कार्तिकेय तामिळनाडू येथील लाकडावर कोरण्यात आलेली अठराव्या शतकातील कावड त्यांनी नेपाल येथून मिळवले आहे. त्यांच्याकडे महाबळीपुरम यांची प्रतिकृती असलेले शिवलिंग असून त्यात संपूर्ण शिव,पार्वती, गणेश हे शिव कुटुंब आहे. अनेक शिल्प हे त्यांना असेच जुन्या बाजारात, फूटपाथवर मिळाले आहेत.
त्यांच्याकडे २०० हून अधिक प्राचीन शिल्प संग्रहितअसल्याची माहितीही डॉ. कोठारी यांनी दिली आहे. संग्रहित केलेल्या सर्व शिल्पांचा कालावधी शोधण्यासाठी आणि ते प्रमाणित करण्यासाठीचे सर्व प्रकारचे सोपस्कार त्यांनी केले आहेत. त्याचे प्रमाणपत्र आणि माहितीही त्यांनी शिल्पासोबत लावली आहे.
सहाव्या शतकापर्यंत मिळालेल्या गणेशमूर्तींमध्ये मूषक म्हणजेच उंदीर हे शिल्पात कुठेही दिसलेले नसून ते केवळ सहाव्या शतकानंतरच्या शिल्पांमध्ये दिसतात असा दावाही डॉ. कोठारी यांनी केला आहे. ते म्हणाले "मुंबईत मी मोठ्या धाडसाने हे प्रदर्शन भरवले आहे. माझे हे पहिलेच आणि अखेरचे प्रदर्शन ठरेल. कारण, मला यापुढे असा खर्च परवडणार नाही."