महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'मुंबईत कोरोनाचा फैलाव थांबविण्यासाठी प्रभागांमध्ये भरारी पथके करणार तपासणी' - मुंबई

देशाची राजधानी असलेल्या मुंबईत कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असून याचा फैलाव थांबविण्यासाठी पालिकेच्या 227 प्रभागांमध्ये भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. ही पथके आजपासून घराघरांत जाऊन तपासणी करणार आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

By

Published : Mar 31, 2020, 3:56 PM IST

मुंबई- मुंबईत कोरोनाचा फैलाव थांबविण्यासाठी युद्धपातळीवर काटेकोर पावले उचलण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. पालिकेच्या सर्व 227 प्रभागांमध्ये पालिकेची भरारी पथके आजपासून घराघरांमध्ये तपासणी सुरू करणार आहेत.

राज्यांतील इतर जिल्ह्यांच्या तुलनेने मुंबईमधील लोकसंख्या, दाट लोकवस्ती तसेच विषाणू प्रसार होण्याची शक्यता लक्षात घेऊन सोमवारी (दि. 30 मार्च) मुख्यमंत्र्यांनी मुंबई महानगरपालिकेस हे निर्देश दिले. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी महापालिकेच्या उपायुक्त तसेच वॉर्ड अधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा करून महत्त्वपूर्ण सूचना दिल्या आहेत.

यावेळी आयुक्त प्रवीण परदेशी यांनी कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी पालिका करीत असलेल्या विविध उपाययोजनांची तसेच पुढील नियोजनाच्या अंमलबजावणीची माहिती दिली. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, परिवहन मंत्री अनिल परब उपस्थित होते.

कोणत्याही परिस्थिती फैलाव थांबवा

वरळी कोळीवाड्यात कोरोनाची लागण झाल्यानंतर संपूर्ण कोळीवाडाचा परिसर दुषित क्षेत्र म्हणून घोषित केला असून तेथील नागरिकांच्या हालचालीवर निर्बंध आले आहेत. या घटनेनंतर अशाच प्रकारे मुंबईत साथ फैलावून आणखी दुषित क्षेत्र निर्माण झाल्यास आरोग्य यंत्रणा तसेच प्रशासनाला हा फैलाव आटोक्यात आणण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतील. मुंबई हे एक प्रमुख शहर असून देशाची आर्थिक राजधानी आहे. या ठिकाणी कोणत्याही परिस्थिती नियंत्रणात राहिली पाहिजे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, की तातडीने भरारी पथके सक्रीय करून तपासणीस सुरुवात झाली पाहिजे.

या पथकांकडे एक वाहन तसेच पालिका अधिकारी कर्मचारी, पोलीस तसेच महसूल विभागाचा कर्मचारी व वैद्यकीय सहायक असेल. हे पथक कोरोनाविषयक रुग्ण, त्यांच्या संपर्कात आलेले लोक यांची माहिती प्रत्यक्ष जाऊन घेतील तसेच ताप, सर्दी, न्यूमोनियासदृश्य आजार असलेले लोकदेखील शोधतील. त्यांच्या तपासणीसाठी तातडीने पुढील कार्यवाही करतील.

हेही वाचा -वरळी, कोळीवाडा अद्यापही सील; आज संशयितांचे अहवाल येण्याची शक्यता

ABOUT THE AUTHOR

...view details