मुंबई- बंगालच्या उपसागरामध्ये अत्यंत कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे, पुढील २ ते ३ दिवस महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे. अशी माहिती भारतीय हवामान विभागने आज दिली.
महाराष्ट्रात पुढील २ ते ३ दिवस मुसळधार पावसाची शक्यता - Maharashtra Rain
मध्य महाराष्ट्रात बुधवारी पावसाची हजेरी लागेल, तर मुंबई आणि कोंकण भागात १५ आणि १६ ऑक्टोबरला पाऊस पडेल, अशी माहिती हवामान विभागातील अधिकाऱ्याने दिली आहे.
पावसाची शक्यता
मध्य महाराष्ट्रात बुधवारी पावसाची हजेरी लागेल, तर मुंबई आणि कोंकण भागात १५ आणि १६ ऑक्टोबरला पाऊस पडेल, अशी माहिती हवामान विभागातील अधिकाऱ्याने दिली आहे. तसेच, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे मराठवाडा, उत्तर मराठवाडा आणि विदर्भातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती महसूल अधिकाऱ्यांनी दिली.
हेही वाचा-सरकारी जमीन घोटाळा प्रकरण; आझम खान यांच्या पत्नीसह मुलाला जामीन मंजूर