मुंबई :बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे निर्माण झालेले क्षेत्र तीव्र झाले आहे. त्यामुळे पश्चिम किनारपट्टीवर पुढचे ३-४ दिवस वारे जोरदार वाहणार आहे. राज्यात मुसळधार ते अतीमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. मुंबईला यलो अलर्ट दिला आहे. काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला ऑरेंज अलर्ट दिला आहे. तर, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांना यलो अलर्ट देत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
15 सप्टेंबरपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात १४ ते १५ सप्टेंबरपर्यंत काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील घाट विभागात १४ सप्टेंबरपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज आहे. नंदुरबार, नाशिक, जळगाव जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल. १३ सप्टेंबरला जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. या दिवशी विदर्भातील सर्वच जिल्ह्यात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे.
नाशिकमध्ये मुसळधार, गोदावरी ओव्हरफ्लो
नाशिकमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली आहे. जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला आहे. मुसळधार पावसामुळे गोदावरी नदी ओसंडून वाहू लागली आहे. नाशिकमध्ये मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. पाहा व्हिडिओ