महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Maharashtra Monsoon update : मुंबईसह राज्यात पावसाची दमदार हजेरी, पुढील 4-5 दिवसांत अतिवृष्टीचा अंदाज

मुंबईसह राज्याच्या अनेक भागात मुसळधार पाऊस झाला. मुंबईतील नेक भागात वाहतूक कोंडी, झाड पडण्याच्या घटना घडल्या. तर मुंबईतील काही भागात पाणी साचले होते. वाशीम, औरंगाबाद, पालघर जिल्ह्यातही जोरदार पाऊस झाला आहे.

मुंबईसह राज्यात पावसाची दमदार हजेरी
मुंबईसह राज्यात पावसाची दमदार हजेरी

By

Published : Jun 25, 2023, 8:37 AM IST

Updated : Jun 25, 2023, 9:11 AM IST

मुंबई : शनिवारी मुंबईसह राज्याच्या अनेक भागात मुसळधार पाऊस झाला. मुंबईतील अनेक परिसरात पाणी साचल्याचे चित्र दिसले. मुंबईतील गोवंडी परिसरात पावासने दोन बळी घेतले आहेत. तसेच अनेक भागात वाहतूक कोंडी, झाड पडण्याच्या घटना आणि शॉर्ट सर्किट झाल्याची माहिती नागरी आणि पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई झाली. काल झालेल्या पावसामुळे दादर, अंधेरी, माटुंग, चुनाभट्टी परिसरात पाणी साचले होते. यामुळे वाहनचाकांची मोठी तारांबळ उडाली. मुंबईतल्या सायन किंग्ज सर्कलमध्ये पाणी तुंबले होते. दरम्यान, भारतीय हवामानशास्त्र विभागाने मुंबईसाठी यलो अलर्ट जारी केला असून पुढील 4-5 दिवसांत महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

पावसामुळे 11 झाडे पडली : अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, चेंबूरमध्ये दिवसभरात 80.04 मिलिमीटर पाऊस झाला, तर विक्रोळीसाठी 79.76 मिमी, सायनमध्ये 61.98, घाटकोपरमध्ये 61.68 आणि माटुंग्यात 61.25 मिमी पाऊस पडला. सायंकाळी जारी केलेल्या निवेदनात बृहन्मुंबई महानगरपालिकेने सांगितले की, पावसामुळे 11 झाडे पडली आहेत. तर रात्री 8 वाजेपर्यंत शॉर्ट सर्किटच्या 7 घटना घडल्या. महानगराच्या पूर्व उपनगरात 69.86 मिमी पाऊस पडला, तर पश्चिम उपनगरात 73.57 मिमी पाऊस झाला. महानगराच्या पूर्व उपनगरात 69.86 मिमी पाऊस पडला, तर पश्चिम उपनगरात 73.57 मिमी पाऊस झाला.

वाहतुकीवर परिणाम : अंधेरी सबवे जलमय झाल्यानंतर वाहतूक एसव्ही रोडकडे वळवण्यात आली होती. तर बीडी रोडवर, महालक्ष्मी मंदिराच्या परिसरात आणि असल्फा, साकीनाका जंक्शन आणि वरळी सीलिंकजवळील गफ्फार खान रोड सारख्या भागात वाहनांची गती मंदावली होती. दरम्यान, अशीच परिस्थिती कुर्ला, सांताक्रूझ आणि एसव्ही रोडवर पाहायला मिळाली, तर दादर टीटी, सायन रोड, टिळक नगर आणि दहिसर भुयारी मार्गात पाणी साचले होते. अनेक नेटिझन्सनी ट्रॅफिक पोलिसांना अपडेट्स विचारण्यासाठी ट्विट केले होते. काहींनी घाटकोपरमधील श्रेयस सिनेमाजवळ, गोरेगावमधील बांगूर नगर ते मालाडमधील मिठ चौकी तसेच पंतनगरपर्यंतच्या लिंक रोडवर वाहतूक कोंडीची माहिती दिली.

कंत्राटी सफाई कामगारांचा मृत्यू : गोवंडी परिसरातील शिवाजी नगर परिसरामध्ये नालेसफाईचे काम करत असताना 2 कामगारांचा मृत्यू झाला आहे. रामकृष्ण( 25) आणि सुधीर दास ( 30) अशी मृतांची नावे आहेत. शनिवारी सायंकाळी दोघेही गोवंडी नालेसाफाईचे काम करत होते. यावेळी ते नाल्यात पडले. या दोघांना अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ बाहेर काढले. त्यांना घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले परंतु यावेळी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले.

राज्यातील अनेक भागात पाऊस : वाशिम जिल्ह्यातील अनेक भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यात पावसाचा आगमन झाले. पहिल्याच पावसात सोलापुरातील लोकांचे हाल झाले. पहिल्याच पावसामुळे अनेक नागरिकांच्या घरात आणि दुकानात पाणी शिरले. पालघर जिल्ह्यात पावसाने जोर पकडला आहे. जिल्ह्यातील सर्वच भागात समाधानकारक पाऊस झाला.

हेही वाचा -

  1. Monsoon Maharashtra update : मृग नक्षत्र गेले कोरडे; पेरणीसाठी बळीराजा मेघराज्याच्या प्रतिक्षेत
  2. Heat Stroke In Maharashtra : पाऊस लांबला; उष्माघाताने अडीच हजार नागरिक बाधित, आतापर्यंत राज्यात 12 जणांचा मृत्यू
Last Updated : Jun 25, 2023, 9:11 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details