मुंबई - दोन दिवसांपासून मुंबईत सुरू असलेल्या पावसाचा जोर अद्यापि कायम आहे. तर पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. यामुळे मुंबईत जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईतील काही भागात जोरदार अतिमुसळधार पाऊस कोसळू शकतो, असा इशारा हवामान विभागाने दिला असून नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
मुंबई उपनगरमध्ये पावसाचा जोर कायम -
मुंबईत दोन दिवसापासून सुरू असलेल्या पावसाने अक्षरशा धुमाकूळ घातला आहे. सतत कोसळणाऱ्या पावसाने मुंबईत मोठी जीवितहानी देखील झाली आहे. मात्र अजूनही धोका कायम आहे. पुढील चोवीस तासांत मुंबईमध्ये जोरदार पाऊस होऊ शक्यता आहे. असा इशारा हवामान खात्यातर्फे देण्यात आलेला आहे. मुंबईसह संपूर्ण कोकण जिल्ह्यालाही सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. मुंबई उपनगरमध्ये पावसाचा जोर कायम आहे.
रस्ते आणि रेल्वे वाहतूक सुरळीत -
गेले दोन दिवस पडलेल्या जोरदार पावसामुळे रेल्वे आणि रस्ते वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र आजची स्थिती पाहिल्यास रस्ते वाहतूक आणि रेल्वे वाहतूक सुरळीत सुरू आहे. मात्र, असाच पाऊस सुरू राहिल्यास पुन्हा एकदा मुंबईची तुंबई होऊ शकते. सर्व स्थिती पाहता मुख्यमंत्री देखील प्रशासनाला अलर्ट राहण्याची निर्देश दिलेले आहे.