मुंबई - सोमवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील महत्वाच्या पश्चिम,हार्बर,मध्य या तिन्ही मार्गावरील रेल्वे वाहतूक प्रभावित झाली आहे. यामुळे अत्यावश्यक सेवेसाठी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
मुसळधार पावसामुळे पश्चिम, हार्बर,मध्य मार्गावरील वाहतूक प्रभावित - heavy rain in mumbai news
सोमवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील महत्वाच्या पश्चिम,हार्बर,मध्य या तिन्ही मार्गावरील रेल्वे वाहतूक प्रभावित झाली आहे. यामुळे अत्यावश्यक सेवेसाठी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
![मुसळधार पावसामुळे पश्चिम, हार्बर,मध्य मार्गावरील वाहतूक प्रभावित मुसळधार पावसामुळे पश्चिम, हार्बर,मध्य मार्गावरील वाहतूक प्रभावित](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-8285826-1019-8285826-1596520618717.jpg)
काल रात्रीपासून शहरात मुसळधार पाऊस सुरु आहे. यामुळे पश्चिम रेल्वे मार्गावर प्रभादेवी व दादर स्थानकात मोठया प्रमाणात रुळावर पाणी साचले आहे. त्यामुळे दादरपर्यंत उपनगरीय मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. वांद्रे ते डहाणू दरम्यान उपनगरीय गाड्या धीम्यागतीने उशिरा सुरू आहेत. तर, हार्बर मार्गावरील वडाळा स्थानकात आणि मध्य रेल्वेच्या परळ स्थानकात रुळावर मोठया प्रमाणात पाणी साचल्याने मुख्य व हार्बर मार्गावरील वाहतूक सेवा रद्द करण्यात आली आहे. वाशी ते पनवेल आणि पनवेल ते ठाणे आणि कल्याण पर्यंत शटल सेवा सुरू आहेत. या पावसामुळे डाऊन दिशेला जाणाऱ्या मेल एक्सप्रेस गाड्यांचे वेळापत्रक देखील कोलमडले आहे. यामुळे अत्यावश्यक सेवेसाठी जाणाऱ्या कर्मचारी खोळंबले आहेत.