मुंबई - शनिवारी (दि. 4 जुलै) मध्यरात्रीपासून पावसाचा जोर मुंबईत वाढला आहे. मुसळधार पावसामुळे पूर्व आणि पश्चिम उपनगरात अनेक ठिकाणी सखोल भागात पाणी साचले आहे. दादर, सायन, भांडुप, घाटकोपर, मुलुंड, विक्रोळी येथील भागात पावसाचा जोर अधून-मधून कायम आहे.
शुक्रवारी (दि. 3 जुलै) मुंबईसाठी दिलेला रेड अलर्ट आज देखील कायम ठेवण्यात आला आहे. हवामान खात्याने पावसाबाबत दिलेला अंदाज अजूक ठरला आहे. पावसाचा जोर कायम असेल असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. गेल्या 24 तासात मुंबईत 200 मीमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. पूर्व उपनगरात भांडूप एलबीएस मार्ग, व्हिलेज रोड येथे पाणी भरले आहे. काही ठिकाणी इमारतींच्या प्रवेशद्वारातच पाणी साचले आहे. त्यामुळे प्रवेश करण्यासाठी रहिवाशांना कसरत करावी लागत आहे. अत्यावश्यक असल्याशिवाय घराबाहेर पडू नका, असे आवाहन देखील हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
गुजरातमध्ये तीव्र पावसाचा इशारा