मुंबई - आज मुंबईत मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या तापमानामुळे मुंबईकरांना उकाडा सहन करावा लागत होता. मात्र, आज मुसळधार पाऊस पडल्याने मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.
दोन दिवसाच्या विश्रातीनंतर मुंबईत मुसळधार पाऊस, वातावरणात गारवा - मुंबई पाऊस
हवामान खात्याने महाराष्ट्रात मान्सून दाखल झाल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर मुंबईत पावसाने हजेरी लावली. मात्र, गेल्या एक-दोन दिवसांपासून तापमानामध्ये वाढ झाली होती. त्यामुळे वातावरणात प्रचंड उकाडा जाणवत होता. मात्र, मुसळधार पाऊस बरसायला सुरुवात झाली आणि वातावरणात गारवा निर्माण झाला.
हवामान खात्याने महाराष्ट्रात मान्सून दाखल झाल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर मुंबईत पावसाने हजेरी लावली. मात्र, गेल्या एक-दोन दिवसांपासून तापमानामध्ये वाढ झाली होती. त्यामुळे वातावरणात प्रचंड उकाडा जाणवत होता. मात्र, मुसळधार पाऊस बरसायला सुरुवात झाली आणि वातावरणात गारवा निर्माण झाला. सकाळीच मुंबईतील मध्यवर्ती ठिकाणी म्हणजे दादर, परळ, हिंदमाता आणि दक्षिण मुंबईत पावसाने दमदार हजेरी लावली. तसेच वेधशाळेने मुंबईत आज दिवसभर मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.